Teachers News : राज्यातील शिक्षकांना दिलासा! E-KYC बाबत सर्वात मोठी अपडेट; जून 2026 पर्यंत मुदतवाढ

maharashtra teachers ekyc deadline extended : राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आदेशामुळे, शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व राज्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आपल्या बँक खात्याचे ई-केवायसी (E-KYC) तातडीने पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे.
Teacher recruitment
Teacher recruitmentSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • ई-केवायसी न केल्यास वेतन रोखण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

  • शिक्षण विभागाने परिस्थिती लक्षात घेऊन जून 2026 पर्यंत ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली आहे.

  • या निर्णयामुळे शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

maharashtra teachers News : राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आदेशामुळे आपल्या बँक खात्याचे ई-केवायसी तातडीने करायची आहे. शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ई केवायसी न करणाऱ्या शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही, असे आधीच स्पष्ट शिक्षण विभागाने केले आहे. यामुळे सध्या शिक्षकांची धावपळ उडाली आहे. सध्या शिक्षकांच्या खांद्यावर विद्यार्थ्यांचे निकालासाह निवडणूक आयोगाचेही काम आहे. अशातच ई केवायसी करण्याचे बंधन घालण्यात आले असून त्याला कमी कालावधी दिला आहे. यामुळे नेमंक कोणतं काम करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

आता राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून ई केवायसीची जूनपर्यंत मुदतवाढ केली आहे. पण शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जून २०२६ शेवटपर्यंत ई-केवायसी करावी लागणार आहे. तर ही मुदत अखेरची असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

शिक्षकांकडून संताप

दरम्यान राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असतानाच आता जनगणनेची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. यातच विद्यार्थ्यांचे निकालही वेळेत लावावे लागणार आहेत. यातच अशा पद्धतीने बँक खात्याचे ई केवायसी करण्याचे आदेश शिक्षकांकडून संताप करण्यात येत आहे. तर या निर्णयाला विरोध केला जात आहे.

Teacher recruitment
ZP Teachers Transfer: हजारो शिक्षकांना दिलासा! बदल्या पुढे ढकलल्या; सर्व जिल्हा परिषदांना आदेश

शिक्षक महासंघाची मागणी

ई केवायसी करण्यासाठी देण्यात आलेला कालावधी अत्यंत कमी असल्याने शिक्षकांत संताप आहे. यामुळे ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली होती. याबाबत बोरनारे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व सचिवांची भेट घेत तसे निवेदन दिले होते. तर या निवेदनातून सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत वेतन थांबवणे हे नियमबाह्य असल्याचे म्हटले होते. ज्यानंतर आता वित्त विभागाने परिपत्रक जारी करत नवीन मुदत जाहीर केली आहे. ज्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुदतवाढ जूनपर्यंत... पण...

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक संघाच्या नाराजीनंतर वित्त विभागाने नव्याने परिपत्रक जारी केले. ज्यात ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून पर्यंत ई केवायसी पूर्ण करावी लागेल. तरच मे महिन्याचा पगार जूनमध्ये मिळेल. अन्यथा तो होणार नाही. तसेच ही मुदत अखेरची असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असाही निर्णय वित्त विभागाने जाहीर केला आहे.

Teacher recruitment
Teachers Training 2026 : शिक्षकांना उन्हाळी सुट्टी नाहीच! नवा अभ्यासक्रम अन् बंधनकारक प्रशिक्षण, सरकारचा मोठा निर्णय

FAQs :

1. ई-केवायसी का आवश्यक आहे?
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे.

2. ई-केवायसीची नवीन अंतिम तारीख काय आहे?
जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

3. ई-केवायसी न केल्यास काय परिणाम होणार होता?
मे महिन्याचे वेतन रोखले जाऊ शकत होते.

4. कोणाला ही मुदतवाढ लागू आहे?
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे.

5. या निर्णयामुळे काय फायदा झाला?
शिक्षकांवरील ताण कमी झाला आणि त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com