Teachers Training 2026 : शिक्षकांना उन्हाळी सुट्टी नाहीच! नवा अभ्यासक्रम अन् बंधनकारक प्रशिक्षण, सरकारचा मोठा निर्णय

Teachers Summer Vacation Cancelled : राज्यस्तरावरील प्रशिक्षण ४ ते ७ मे दरम्यान मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येईल. जिल्हास्तरावरील प्रशिक्षण ११ ते १४ मे दरम्यान मराठी व इतर माध्यमांसाठी घेतले जाईल. तालुकास्तरावरील प्रशिक्षण १८ ते ३० मे दरम्यान राबवण्यात येणार आहे.
Teachers Training 2026 | Summer Vacation Cancelled
Teachers Training 2026 | Summer Vacation CancelledSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 14 Apr : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार असल्याने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद शिक्षकांसाठी विशेष अध्यापन प्रशिक्षण आयोजित करणार आहे.

हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी बंधनकारक असून, उन्हाळी सुट्टीतच घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण ४ मेपासून सुरू होणार असून, १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षण तीन टप्प्यांत राबवले जाणार असून राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर असे असेल.

राज्यस्तरावरील प्रशिक्षण ४ ते ७ मे दरम्यान मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येईल. जिल्हास्तरावरील प्रशिक्षण ११ ते १४ मे दरम्यान मराठी व इतर माध्यमांसाठी घेतले जाईल. तालुकास्तरावरील प्रशिक्षण १८ ते ३० मे दरम्यान राबवण्यात येणार आहे. उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण केवळ राज्य आणि जिल्हा स्तरापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे.

Teachers Training 2026 | Summer Vacation Cancelled
Ashok Kharat : अशोक खरातसोबतच नेते, अधिकाऱ्यांनीही उत्तर सोलापुरात खरेदी केल्या जमिनी

परिषदेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी यासंबंधी परिपत्रक काढून संबंधित सूचना दिल्या आहेत. राज्यस्तरावरील प्रशिक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली असून, या तज्ज्ञांचा पुढील टप्प्यांतील प्रशिक्षणासाठीही वापर करण्यात येणार आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना सुलभकांची नावे २० एप्रिलपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Teachers Training 2026 | Summer Vacation Cancelled
Census Employees Transfer News: जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक? केंद्राचा आदेश; महाराष्ट्रात काय होणार?

दरम्यान, इयत्ता सहावीसाठी हे प्रशिक्षण समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्याबाबत स्वतंत्र सूचना नंतर दिल्या जाणार असल्याचे एससीईआरटीने स्पष्ट केले आहे. खासगी शाळांतील शिक्षकांसाठीही प्रशिक्षण आयोजित करता येणार असून, विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांसाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल. मात्र, यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद शासनाकडून उपलब्ध नसेल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Teachers Training 2026 | Summer Vacation Cancelled
Pratibha Chakankar Probe : "चाकणकर भगिनींचा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीये, चाकणकर 'SIT'ला की दमानिया महाराष्ट्राला..."

कसे असेल वेळापत्रक?

- राज्यस्तरावरील प्रशिक्षण ४ मे ते ७ मे २०२६ (मराठी व उर्दू माध्यम)

- जिल्हास्तरावरील प्रशिक्षण : ११ मे ते १४ मे २०२६ (मराठी व इतर माध्यम)

- तालुकास्तरावरील प्रशिक्षण: १८ मे ते ३० मे २०२६ (मराठी व इतर माध्यम)

- उर्दू माध्यम: केवळ राज्य व जिल्हा स्तरावरच प्रशिक्षण (तालुकास्तरावर नाही)

- शैक्षणिक वर्ष सुरू : १५ जून २०२६ पर्यंत सर्व प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक

प्रशिक्षण कालावधी : इयत्ता दुसरीसाठी ३ दिवस, तिसरी-चौथीसाठी ४ दिवस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com