TET Dress Code : TET परीक्षेआधी मोठा निर्णय! ओढणी-बुरख्यावरची बंदी मागे; पण परीक्षा परिषदेनं घातली ‘ही’ महत्त्वाची अट

TET exam dress code guidelines: टीईटी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वी जारी करण्यात आलेल्या नियमावलीत महिला उमेदवारांना ओढणी आणि बुरखा परिधान करण्यास बंदी घालण्यात आली होती.
TET Exam Burqa Rule
TET Exam Burqa RuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra TET Exam Latest Update : महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाची असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) येत्या 28 जून रोजी पार पडणार असून, परीक्षेपूर्वी राज्य परीक्षा परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वी जारी करण्यात आलेल्या नियमावलीत महिला उमेदवारांना ओढणी आणि बुरखा परिधान करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र या निर्णयावर विविध स्तरातून आक्षेप नोंदवल्यानंतर आता परीक्षा परिषदेने आपली भूमिका बदलली आहे.

राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बोडसे यांनी नव्या परिपत्रकाद्वारे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) सुधारित नियम जाहीर केले. त्यानुसार आता महिला उमेदवारांना ओढणी किंवा बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार आहे, मात्र एक अत्यावश्यक अट लागू करण्यात आली आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा चेहरा स्पष्टपणे दिसणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेची (Exam) पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखणे हेच या निर्णयामागचे मुख्य कारण असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे. उमेदवारांची ओळख निश्चित करण्यासाठी ओळखपत्र पडताळणी, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, सीसीटीव्ही (CCTV) निरीक्षण आणि परीक्षा केंद्रावरील सुरक्षा तपासणी या प्रत्येक टप्प्यावर चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असणार आहे.

TET Exam Burqa Rule
Census Duty : जनगणना कामावर हायकोर्टाचा मोठा दणका! खासगी शाळांच्या शिक्षकांना सक्ती नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क महत्त्वाचा

गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा आणि शासकीय परीक्षांमध्ये डिजिटल गॅझेट्सचा वापर करून कॉपी करणे, ब्लूटूथ डिव्हाइसद्वारे उत्तरं मिळवणे, तसेच डमी उमेदवार बसवून फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कोणतीही जोखीम न घेता यंदाची TET परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलत आहे.

TET Exam Burqa Rule
Sanjay Raut Calls Bhausaheb Wakchaure : ‘गद्दारांना सुरक्षा, शिवसैनिकांना नजरकैद?’ शिर्डीत वाकचौरेंच्या एंट्रीनंतर संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

विशेष म्हणजे, केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चेहरा झाकणाऱ्या वस्तूंवर आधीपासूनच निर्बंध आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही नियम लागू करण्यात आले होते. मात्र सामाजिक आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन आता परिषदेनं नियमात बदल करत सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने नुकताच झालेल्या डीएड, संगणक लघुलेखक परीक्षेमध्ये उमेदवारांनी दुपट्टा, बुरख्यामध्ये मोबाईल लपवून परीक्षा केंद्रात आणल्याचे, त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले, तरी टीईटी परीक्षेत बुरखा अन् दुपट्ट्यावर बंदी न घालण्याच निर्णय घेतला आहे.

आता 28 जूनला होणाऱ्या TET परीक्षेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, परीक्षा परिषदेसमोर परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com