

Maharashtra infrastructure project : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने सर्व महापालिकांमध्ये आपली ताकद दाखविण्यासाठी जोर लावला आहे. दोन्ही शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांनीही कंबर कसली आहे. तर दुसरीकडे नववर्षाच्या स्वागताची धामधूमही सुरू आहे. अशातच मोदी सरकारने महाराष्ट्राला मोठे गिफ्ट दिले आहे.
केंद्र सरकारच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. या बैठकीमध्ये नाशिक-सोलापूर-अक्कलकोर्ट या सहा लेनच्या महामार्गाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या मार्गाची निर्मिती बीओटी तत्वावर केली जाणार आहे. हा महामार्ग ३७४ किलोमीटर लांबीचा असणार असून त्यासाठी तब्बल १९ हजार १४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
केंद्राने मंजुरी दिलेल्या या कॉरिडोरमुळे नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांना व शहरांना सुपरफास्ट मार्गाने जोडले जाणार आहे. पुढे कर्नूलपर्यंत ही कनेक्टिव्हिटी असणार आहे. या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर लाखो रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मोदी सरकारने व्यक्त केला आहे.
नाशिक ते अक्कलकोटपर्यंतचा हा प्रस्तावित मार्ग वाढवण पोर्ट इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, नाशिकमधील अडेगांवजवळ आग्रा-मुंबई कॉरिडॉर आणि नाशिकजवळ पांगरीमध्ये समृध्दी महामार्गाला जोडला जाईल. या कॉरिडॉरमध्ये प्रवासाच्या वेळेत तब्बल १७ तासांची बचत होणार असून अंतरही २०१ किलोमीटरने कमी होणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आमि सोलापूर जिल्ह्यांच्या आर्थिक विकासात या योजनेचे महत्वाचे योगदाने असेल, अशी आशाही सरकारने व्यक्त केली आहे. भविष्यात पुणे-नाशिक कनेक्टिव्हिटीसाठीही या महामार्गाचा फायदा होणार आहे. कर्नूलमधून हा मार्ग चेन्नई पोर्टपर्यंत असणार आहे. या मार्गाचे काम आधीपासूनच सुरू झाले आहे. सूरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरअंतर्गत हा महामार्ग विकसित केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.