BJP Politics : मुनगंटीवारांनी काडी टाकली, 'लाडक्या बहिणीं'नी धाडस दाखवत सुरूंग लावला...

BJP worker resentment : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एका इच्छूक महिलेने उघडपणे त्यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखविली.
BJP Politics
Mahapalika ElectionSarkarnama
Published on
Updated on

BJP ticket distribution controversy : राज्यात मागील काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू आहे. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका दणक्यात पार पडल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. या विजयाने विश्वास दुणावलेल्या भाजपने महापालिका निवडणुकीतही महायुतीली पक्षांसह विरोधकांना हिसका दाखवत अनेक माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचले. निष्ठावंतांची तिकीटे कापत नव्यांना उमेदवारीही दिली. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांचा कडेलोट झाला. प्रामुख्याने महिला कार्यकर्त्यांच्या संतापाने शिष्तबध्द पक्ष म्हणविणाऱ्या भाजपच्या शिस्तीवरच प्रश्न निर्माण केले.

नगरपरिषद निवडणुकीतही भाजपने अन्य पक्षातून आलेल्या अनेकांना उमेदवारी देत निष्ठावंतांना नाकारले होते. यावरून पक्षाचे ज्य़ेष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच कान उपटले होते. शनी-शिंगणापूरप्रमाणे पक्षाची दारे उघडी असल्याचे सांगत त्यांनी घरचा आहेर दिला होता. गटबाजी निर्माण होईल, असे वातावरण पक्षाने निर्माण केल्याचेही ते म्हणाले होते. मुनगंटीवार यांनी काही गोष्टी केवळ त्यांच्या चंद्रपूर जिल्हापुरत्या बोलल्या असल्या तरी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची स्थिती फारशी वेगळी नव्हती. आता तेच चित्र महापालिका निवडणुकांमध्येही दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, मुंबई, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी तिकीट न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. काल संभाजीनगरमध्ये तर एका महिला कार्यकर्तीने पक्षाच्या कार्यालयात पेट्रोल आणले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील दुर्घटना टळली. चार ते पाच महिला इच्छूकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की त्यांना रडू कोसळले. नेत्यांच्या नावांचा टाहो त्या फोडत होत्या. काही पुरूष इच्छुकांनीही संताप व्यक्त केला.

BJP Politics
Eknath Shinde news : अखेर भाजपने एकनाथ शिंदेंना ‘आरसा’ दाखविलाच, हा इशारा समजायचा की एक घाव दोन तुकडे..?

आजही काही इच्छूक महिला उपोषणा बसल्या आहेत. कार्यकर्त्यांनी खासदार भागपत कराड यांच्या गाडी अडवून गाडीलाच काळे फासले. त्यामुळे कराड यांना कार्यालयातून आल्या पावली परत जावे लागले. काल जालन्यातील एका इच्छूक महिलेचा रडत-रडत पदाधिकाऱ्यांशी वाद घालतानाचा, एक महिला इच्छूक बेशुध्द पडल्याचा व्हिडीओही सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. राज्यातील अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्त्यांची ही नाराजी समोर येत आहे.

मुंबईतील कार्यकर्तेही त्यात मागे राहिलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एका इच्छूक महिलेने उघडपणे त्यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखविली. आपण एवढी वर्षे काम करूनही उमेदवारी मिळाली नाही, आपलं काय चुकलं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. तो व्हिडीओही सध्या लक्ष वेधून घेत आहेत. ही स्थिती अनेक इच्छुकांची आहे. काहींनी उघडपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण २०-३० वर्षे पक्षात काम करूनही तिकीट मिळत नाही, निवडणुकीआधी पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप बहुतेकांकडून केला जात आहे.

BJP Politics
Mahayuti News : हा अपमान मी सहन करणार नाही! केंद्रीय मंत्री महायुतीवर प्रचंड संतापले, आज घेणार मोठा निर्णय...

भाजपप्रमाणेच इतर पक्षांमध्येही अशीच नाराजी असली तरी त्याचे प्रमाणे तुलनेने कमी असल्याचे सध्यातरी दिसत आहे. शतप्रतिशत भाजप, असा भाजप नेत्यांचा नारा आहे. सगळीकडे आपलीच सत्ता हवी, यासाठी सर्वच पक्षांतून ‘कार्यकर्ता चोरी’ (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा शब्दप्रयोग) झाली आणि ती जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडेपर्यंत दिसेल, यात शंका नाही. मात्र, या कार्यकर्ता चोरीने निष्ठावंत दुखावले जात असल्याचे भान नेत्यांना नसेल, हे कुणालाही पटणार नाही. कार्यकर्त्यांची समजूत काढता येईल, कार्यकर्ते समजून घेतील, असे नेते सांगत असतात. आता मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा कडेलोट होत असल्याचे दिसू लागले आहे. त्यांच्या मनातील खदखद उघडपणे बाहेर येऊ लागली आहे. केवळ भाजपच नव्हे तर सर्वच पक्षांसाठी हा एक इशारा आहे.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com