

Maharashtra Vidhan Parishad Winner List : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल 2026 कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 5 जागांसाठी सुरू असलेली मतमोजणी लांबल्याने विजयाचा गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता वाढली आहे. 28 ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, 3 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते, तर 2 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मात्र, अद्याप अंतिम निकालाची अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे विजयी उमेदवारांची यादी स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे 18,385 मतांसह आघाडीवरती आहेत, तर शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर – 11,983 मते मिळाली आहेत. दत्तात्रय सावंत तिसऱ्या क्रमांकावर – 10,891 मते. विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर – 8,965 - 26 व्या फेरी अखेर बाद . विजयाचा कोटा 25,756 मतांचा अद्याप कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण करता आलेला नाही.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली होती. महायुतीचे सतीश चव्हाण आणि शिवसेनेचे दिलीप घुले यांच्यात तिरंगी लढत होती. तिसऱ्या टप्प्यातील शेवटची पडताळणी मतमोजणी पूर्ण. एकूण वैध मते 1, 77,150. त्यामुळे निवडणुकीसाठी 88,558 कोटा ठरला आहे. प्रथम पसंतीचे सर्वाधिक मते डॉ.प्रतापसिंह पाटील (73931) तर दुसऱ्या क्रमांकाचे मते चव्हाण सतीश भानुदास (60768) यांना मिळाली. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी सुरू.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांना निर्णायक महत्त्व प्राप्त होणार आहे. निवडणुकीतील कोटा पूर्ण करण्यासाठी भाजपचे सुधाकर कोहळे यांना 14 हजार 514 आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना 18 हजार 808 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे बाद होणाऱ्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीक्रमाची मते कोणाच्या पारड्यात पडतात, यावर निकालाचे गणित अवलंबून असेल.
या निवडणुकीत आतापर्यंत १५ हजार ३२ मते अवैध ठरली आहेत. विजयी होण्यासाठी ७५ हजार ४३८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कराळे मास्तर यांना मिळालेली २४ हजार २४९ मते बाद होणाऱ्या मतांमध्ये समाविष्ट होतील. याशिवाय अन्य ३५ उमेदवारांची ७ हजार ९७५ मते बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण ३२ हजार ३२४ मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांचे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर होते. काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यातही स्पर्धा होती.
अमरावती शिक्षक मतदारसंघ 19 व्या बाद फेरीनंतर किरण सरनाईक : 9168 मतांनी आघाडीवर तर काँग्रेसच्या अदिती पोहरे : 5508 आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे : 5202 यांना मिळाली आहेत. त्यामुळे निवडणुकीचा विजयासाठी कोटा : 16,134 ठरला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्यावर ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी १ हजार ८१६ मतांची गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.