Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अजितदादानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Political News : अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाही.
Eknath Shinde Ladki Bahin
Eknath Shinde Ladki BahinSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज्यात महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण या योजनेंतर्गत मिळणाऱ्या हफ्त्यामध्ये वाढ करू, लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असले तरी 2100 रुपये कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्याकडे लक्ष लागले असतानाच याबाबत शुक्रवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे.

लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे (Ladki Bahin yojna) वळवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण आले आहे. मात्र ही योजना सुरूच राहणार असून, पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

Eknath Shinde Ladki Bahin
Aditya Thackeary : दिशा सालियनप्रकरणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? आदित्य ठाकरे म्हणाले, 'कचऱ्याकडे..'

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्पात काय घोषणा होणार का ? याकडे महिलांचे लक्ष लागले होते.

Eknath Shinde Ladki Bahin
Ajit Pawar News : सगळी सोंग करता येतात, पैशाची नाही; आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार!

याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रूपये देवू, असे एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Eknath Shinde Ladki Bahin
Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्राच्या विधिमंडळात 'हे' आमदार पती-पत्नी करणार नवा रेकॉर्ड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com