मला संपवण्यासाठी षडयंत्र, पण माझ्याामागे बिरोबा-खंडोबाचा आशीर्वाद

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल झाले आहे.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkarsarkarnama
Published on
Updated on

आटपाटी : महाविकासआघाडी विरोधात आवाज उठवल्याने आणि एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाल्यानेच मला संपवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप आमदार आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या षडयंत्रमधून आटपाडी या ठिकाणी आपल्यावर वरिष्ठ पातळीपासून नियोजन करून हल्ला करण्यात आला, पण खंडोबा, बिरोबा, विठोबा यांचा आशीर्वाद आपल्यामागे असल्याचेही आमदार पडळकर म्हणाले. ते आटपाडीमधील झरे इथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सांगलीतील आटपाडीमध्ये रविवारी आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांच्या गटामध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये २ जण किरकोळ जखमी झाले तर दोन ते तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल झाले आहे. याच सर्व प्रकरणावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले.

Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर गट अन् शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात जोरदार राडा

वारंवार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आपणा आवाज उठवत आहोत आणि यातून आपल्याला अडवण्यासाठी, रोखण्यासाठी संपवण्याच्या दृष्टीने षडयंत्र करून हा हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात एसटी आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये १० नोव्हेंबर रोजी एसटीचे मोठे आंदोलन आपण पुकारले आहे. त्या आंदोलनाच्या ठिकाणी आपण जाऊ नये म्हणून देखील आटपाडीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नियोजन रित्या आपल्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला.

Gopichand Padalkar
पडळकरांचा शाप; ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट सुखानं जगू देणार नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com