Yogendra Yadav : 'या' नेत्याच्या नेतृत्वाखाली 'मविआ'ला विधानसभेला बहुमत मिळेल; योगेंद्र यादवांचा मोठा दावा

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीतही लोकसभेसारखी उत्तम कामगिरी करण्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे.
nana patole uddhav thackeray sharad pawar yogendra yadav
nana patole uddhav thackeray sharad pawar yogendra yadavsarkaranama

Maharashtra Assembly Election 2024 : 2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारण बदललं. शिवसेना ( Shivsena ) आणि राष्ट्रवादीत फूट पडली. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार बनवलं. पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या आहेत.

यानंतर महाविकास आघाडीचे ( mahavikas Aghadi ) लक्ष्य विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेसारखी उत्तम कामगिरी करण्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. पण, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray ) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं निवडणूक लढल्यास मोठं यश मिळेल, असा मोठा दावा राजकीय विश्लेषण योगेंद्र यादव यांनी केला आहे.

"महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निकालाचा परिणाम आणखी जास्त होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मोदी 'फॅक्टर' कमी होईल. भाजपची किमान 2 ते 5 टक्के मते कमी होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढविल्या जात असतील, तर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल," असं योगेंद्र यादव ( yogendra Yadav ) यांनी सांगितलं.

महायुतीचं सरकार मागील दरवाजातून आल्यानं जनतेत नाराजी असल्याचं योगेंद्र यादव म्हणाले. "ज्याप्रकारे शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली आणि मागील दरवाजानं सरकार बनवलं गेलं, त्यामुळे जनतेत नाराजी होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभा निवडणुकीत सुफडासाफ होईल, असा माझा अंदाज होता. मात्र, तो खोटा ठरला. पण, खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती हे निकालातून दिसून आलं," असं योगेंद्र यांनी म्हटलं.

nana patole uddhav thackeray sharad pawar yogendra yadav
Prakash Ambedkar News : 'वंचित' फॅक्टर फेल; प्रकाश आंबेडकरांचा दरारा संपला..!

"लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकरांनी जे काही केलं, ते जनतेला आवडलं नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित महाविकास आघाडीसोबत आली, तर महायुती सत्तेत येण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर आले नाही, तरीही महाविकास आघाडी विधानसभेला पुढे असेल," असं योगेंद्र यादव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com