Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाची नोटीस; लोकसभा निवडणुकीतील विजयाचे काय होणार?

Vinayak Raut Lok Sabha Election 2024 Sindhudurg Constituency : विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या विजयावर आक्षेप घेणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.
Narayan Rane, Mumbai High Court
Narayan Rane, Mumbai High CourtSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत वादात सापडली आहे. ही निवडणूक भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाने जिंकल्याचा दावा करणारी याचिका शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर कोर्टाने शुक्रवारी राणेंना नोटीस बजावली आहे.

राऊत यांनी राणे पितापुत्रांवर गंभीर आरोप याचिकेत केले आहेत. राणेंचा निवड रद्द करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने राणेंसह निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्या खंडपीठीसमोर ही सुनावणी सुरू आहे.

Narayan Rane, Mumbai High Court
J&K Assembly Election 2024 : अखेर 6 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जम्मू-काश्मीरची विधानसभा गजबजणार; ‘370’ चा करिष्मा चालणार का?

नेमकं काय आहे प्रकरण?

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी राऊतांचा पराभव केला आहे. त्यानंतर राऊतांनी राणेंविरोधात याचिका दाखल केली आहे. राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यास आणि मतदान करण्यास बंदी लादण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणुक आयोगाने चौकशी करावी, अशी विनंती राऊतांनी केली आहे. कोर्टाच्या नोटीशीला राणे काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.  

Narayan Rane, Mumbai High Court
CM योगी आदित्यनाथांचा आणखी एक रेकॉर्ड; मुलायम सिंह यादव, मायावती,अखिलेश यादव जवळपासही नाहीत...

मुंबईतील उध्दव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांनीही शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या विजयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कीर्तीकरांचा केवळ 28 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे या याचिकेबाबतही उत्सुकता वाढली आहे. दोन्ही याचिकांवर हायकोर्टाकडून काय निकाल येणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com