MVA political news : मोठी बातमी ! महाविकास आघाडीत राजकारण फिरले; उद्धव ठाकरेंचा आमदार शरद पवारांच्या गाडीत

Maharashtra Politics News : ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कोण एकत्र येणार ? याची चर्चा शिगेला पोहचली असतानाच ठाकरे गटाचे आमदार शरद पवारांच्या गाडीत दिसल्याने भुवया उंचावल्या आहेत.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात घटना घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळींनी महायुतीमध्ये प्रवेश कला आहे. त्यामुळे महायुतीमधील इनकमिंग वाढले आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसापासून राज व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कोण एकत्र येणार ? याची चर्चा शिगेला पोहचली असतानाच ठाकरे गटाचे आमदार शरद पवारांच्या गाडीत दिसल्याने भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे सध्या नेमके काय सुरु आहे याची चर्चा शिगेला पोहचली आहे. बुधवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर शरद पवार यांच्या गाडीत बसून सिल्वर ओकच्या दिशेने गेले आहेत. यावेळी अहिर यांनी सिल्वर ओकवर जाऊन पवार यांच्याशी चर्चा केली.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
India Pakistan War Update : पाकच्या 51 लोकांना भारताने संपवलं, पुरावे आले समोर

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्र्वादी काँग्रेमध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी ४० आमदारांसह खासदार शरद पवार यांच्याशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर "मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" नेमका कुणाचा? या मुद्द्यावरून दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या आहेत. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक गाठीभेटी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis News : शहिद जवानांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी केला फोन

त्यासोबतच काही बैठका व सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र व्यासपीठावर दिसल्याचेही अनेक वेळा पाहायला मिळाले. यानंतर शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पुन्हा एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांचाच असेल,” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? यावर चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
India Pakistan Ceasefire : भाजपने तिरंगा नव्हे ट्रम्प यात्रा भरवाव्यात..., ठाकरे गटाचा हल्लाबोल

नेमकी काय झाली चर्चा ?

दरम्यान, बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर शरद पवार यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी या दोन नेत्यामध्ये काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
India Pakistan Tension : 'कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही!', भारताचा पाकिस्तानसह अमेरिकेला दणका, सिंधूचं पाण्यावरही निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com