Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदावरुन तिढा निर्माण झाला आहे. सर्वाधिक जागा निवडून आल्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकण्यात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेही पुन्हा एकदा सीएमपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीत सत्तास्थापनेसह मुख्यमंत्री पदावरुन मोठा घोळ निर्माण झाला आहे.पण आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या सीएम (Mahayuti CM) पदावरुन मोठं विधान केलं आहे
केंद्रातील एनडीए सरकारमधील सामाजिक व न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी मंगळवारी (ता.26)मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीत मुख्यमंत्री पदावरुन निर्माण झालेल्या घोळावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून नक्की चांगलं काम केलं. त्यांच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. महायुतीच्या महाविजयात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. असंही आठवले यांनी सांगितले.
आठवले म्हणाले, ही विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्यावर झाली.यावेळी संविधानाचा मुद्दा चालला नाही. एवढ्या जागा आमच्या येतील असा आमचा विश्वास, खात्री नव्हती.आम्हाला एवढ्या जागा मिळाल्यानंतर त्यांना ईव्हीएमचा मुद्दा सुचला आहे. भाजपला वाटत आहे की, देंवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत. पण माझं मत असं आहे की, जास्त जागा असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
एकनाथ शिंदे यांच्याबाबत आम्हाला आदर आहे.यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना केंद्रात मंत्री केलं तर फायदा होईल. यातून काहीतरी मार्ग निघेल.हा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह यांना घ्यायचा आहे. पण आता माझ्या पक्षाला एक आमदारकी आणि एक मंत्रिपद मिळाल पाहिजे, अशी मागणीही मंत्री आठवले यांनी उचलून धरली.
महायुतीतील शिवसेनेकडून 'बिहार पॅटर्न'चा दाखला करण्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. यावरही आठवले यांनी रोखठोक भाष्य केलं. ते म्हणाले, पुढच्या 2-3 दिवसांत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होईल. मात्र, बिहारमध्ये आधीच नितीश कुमार यांना शब्द दिला होता. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री केलं. पण एकनाथ शिंदे यांना असा काही शब्द दिला होता, असं मला वाटत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री भाजपचा होईल असं ठाम मतही आठवले यांनी व्यक्त केलं.
बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्याने मतमोजणीला खूप वेळ लागायचा.जर मतांची बेरीज होत नसेल, तर निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. अशा घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत, त्याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, असंही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.