Supreme Court on EVM : महाराष्ट्रात EVM वरून गदारोळ सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

EVM Machine Maharashtra Assembly Election Mahavikas Aghadi Mahayuti : महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएम वरून सरकारवर निशाणा साधला आहे.
Supreme Court, EVM
Supreme Court, EVMSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत आघाडीचा सुपडा साफ केला. मात्र, या पराभवानंतर आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्रात हा गदारोळ सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ईव्हीएमबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

देशातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकांमध्येही ईव्हीएमचाच वापर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मविआपुढील एक पर्याय आता बंद झाला आहे. आघाडीकडून ईव्हीएमविरोधात देशभरात रान उठवले जाण्याची शक्यता असतानाच हा निकाल आल्याने एकप्रकारे विरोधकांना धक्का बसला आहे.

Supreme Court, EVM
Rahul Gandhi : मोदींकडून महाराष्ट्रात चॅलेंज, राहुल गांधींनी संविधान दिनी दिल्लीत घेतलं सावरकरांचं नाव

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

ईव्हीएमविरोधात के. ए. पॉल यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायाधीश विक्रम नाथ यांनी फेटाळून लावली. यावेळी कोर्टाने ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादावर मोठे विधान केले. तुमचा पराभव होतो, तेव्हा ईव्हीएममध्ये गडबड असते आणि तुम्ही जिंकता त्यावेळी ते चांगले असतात, असे कसे असू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टात आपण कोणतेही राजकारण आणलेले नाही. विदेशात अनेक लोकशाही असलेल्या देशांमध्ये मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया होते. त्यामुळे भारतातही अशी प्रक्रिया व्हावी, असे आदेश कोर्टाने द्यावेत, असे याचिकेत म्हटले होते. त्याचप्रमाणे निवडणुकीदरम्यान पैसे, मद्य किंवा इतर वस्तूंचे वाटप करताना आढळून आलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक आयोगाने बंदी घालावी, असे आदेश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती.

Supreme Court, EVM
Digital Arrest : पंतप्रधान मोदींना ज्याची भीती ते जोमात सुरू; ED ची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेचे 3.8 कोटी लुटले

इंडिया आघाडीचे देशभर आंदोलन?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ईव्हीएमविरोधात देशभर आंदोलनाचा नारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत देशभरात ईव्हीएमविरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे. मविआकडूनही महाराष्ट्रात आंदोलन केले जाऊ शकते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत तसे संकेत दिल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com