Mahayuti Government : आमचं सरकार हे EVM चं सरकार! देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

EVM Assembly Session Mahayuti Government Cabinet Expansion : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून हे सरकार ईव्हीएममुळे आल्याचे आरोप केले जात आहेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महायुतीचे सरकार ‘ईव्हीएम’मुळे आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होय, आमचे सरकार ‘ईव्हीएम’चे सरकार असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे. पण यावेळी फडणवीसांनी त्यांच्या ईव्हीएमचा अर्थही सांगितला आहे.

नागपुरात झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांचाही समाचार घेतला. ईव्हीएमवरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून ईव्हीएमबाबत नॅरेटिव्ह तयार केला जात आहे. आम्ही त्याला चर्चेदरम्यान उत्तर देऊ.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत फडणवीसांनी मंत्र्यांना दिला 'हा' इशारा; शिंदे, अजितदादांचंही ठरलंय... 

आमचे सरकार ईव्हीएमचे सरकार असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, आमच्यासाठी ईव्हीएमचा अर्थ एव्हरी व्होट फॉर मॅगनेटिक महाराष्ट्र असा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्रासाठी मतदान केले आहे. तो महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढील काळात कारभार करू, असे फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांना ईव्हीएमवरील टीकेला अधिवेशनात उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

सरपंच हत्याप्रकरणाची एसआयटी चौकशी

बीडमधील सरपंच हत्याप्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, ही केस सीआयडीकडे दिली आहे. विशेष एसआयटी स्थापन करून आम्ही सगळी चौकशी करणार आहोत. आरोपी कुणीही असले तरी सोडले जाणार नाही. अशाप्रकारच्या घटना महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातील. एसआयटीच्या माध्यमातून धागेदोरे शोधून काढण्याच काम केले जाईल.

Devendra Fadnavis
Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

कोम्बिग ऑपरेशन नाही

परभणीमध्ये एका मनोरुग्णाने ज्याप्रकारे संविधानाचा अपमान केला, त्याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर उद्रेकही झाला. अशाप्रकारे मनोरुग्णाच्या कृत्यावर असंविधानक पध्दतीने उद्रेक करणे योग्य नाही. आम्ही पोलिसांना सांगितले आहे की, आकसबुध्दीने कारवाई करू नका. कोम्बिक ऑपरेशन करू नका. पण जे लोक लाठ्याकाठ्या, दगड घेऊन तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

विरोधकांना आवाहन

अधिवेशनादरम्यान विरोधकांनी चर्चा करावी. आम्ही त्यांचा आवाज दाबणार नाही. चर्चेपासून मागे हटणार नाही. फक्त अपेक्षा एवढीच आहे की, लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा. हे लोकशाहीला प्रेरित नाही. सभागृहात न बोलता केवळ मीडियात बोलायचे, हे योग्य नाही. आम्ही सभागृहात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, असा विश्वास फडणवीस यांनी विरोधकांना दिले. तसेच त्यांनी चांगली चर्चा सभागृहात करावी, असे आवाहनही केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com