Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, मतदारसंघ आणि शिवसेनेसाठीच..!

Maharashtra Politics Shinde Family Leadership Shift : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदावर संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
Shrikant Shinde, Eknath Shinde
Shrikant Shinde, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शपथविधीसाठी तीन दिवसांचा कालावधी उरलेला असतानाही अजून मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार, शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण, अशा असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चा निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला.

Shrikant Shinde, Eknath Shinde
Shivsena v/s Shivsena UBT : ठाकरे की आनंद दिघे ? छत्रपती संभाजीनगरात दोन्ही शिवसेना भिडल्या..

मी उपमुख्यमंत्री होणार, अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे, असे सांगत श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदासह केंद्रातही मंत्रिपद नको असल्याचे संकेत दिले आहेत.

Shrikant Shinde, Eknath Shinde
Mahayuti Vs Mahavikas Aghadi : अभूतपूर्व बहुमताकडून अतुलनीय अपेक्षा! महायुती शब्द पाळणार का?

माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये, अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या चर्चांवर पडदा पडला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com