Mahayuti News : राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीत 12 नव्हे तर सातच नावे; कोणाला लागणार लॉटरी ?

Political News : गेल्या पाच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिलेली यादी राज्यपाल कोश्यारी यांनी फायनल केली नाही.
Mahayuti's Leader
Mahayuti's LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या मंडळींना खुश करण्यासाठी राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादी तयार ठेवण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आलेली यादी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आली असल्याचे समजते.

गेल्या पाच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिलेली यादी राज्यपाल कोश्यारी यांनी फायनल केली नाही. त्यानंतर सरकार बदलले त्यामुळे ही यादी मंजूर करण्यात आली नाही. येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत एकदा महायुती (Mahayuti) सरकारने सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आलेली यादी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदार नियुक्तीसाठी महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांनी 6-3-3 चा फॉर्म्युला निश्चित केल्याची चर्चा होती. पण कॅबिनेटच्या बैठकीत केवळ सात जणांच्या नावांचीच यादी मांडण्यात आली. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत 7 जणांच्या नावांचाच समावेश आहे.

त्यामध्ये भाजप (Bjp) 3, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 असा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते. राष्ट्रवादीकडून संजय खोडके, पंकज भुजबळ यांच्या नावांचा समावेश आहे. संजय खोडके अमरावतीचे आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके काँग्रेसच्या आमदार आहेत. त्यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केलेली आहे. सहा वर्षांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.

Mahayuti's Leader
Vinod Tawde : ठाकरेंवर संतापले अन् कॅबिनेटच्या निर्णयाने सुखावले! विनोद तावडेंना झाली वाजपेयींसह मुंडेंची आठवण

पंकज भुजबळ 2009आणि 2014 मध्ये नाशिकच्या नांदगावमधून विजयी झाले होते. 2019 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचे सुहास कांदे जवळपास 14 हजार मतांनी विजयी झाले. महायुतीत नांदगावची जागा शिवसेनेकडे आहे. भुजबळ नांदगावमधून लढण्यास उत्सुक आहेत. पण शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे भुजबळ यांची वर्णी विधान परिषदेवर लावण्याची खेळी अजित पवारांनी केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध झाला. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यानी विचारला होता. त्यामुळे राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत चाकणकर यांचं नाव नसल्याचे समजते.

दरम्यान, राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत 7 जणांच्या नावांचा समावेश आहे. त्यातील 2 नावं राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहेत. भाजप आणि शिवसेना यांनी पाठवलेली नावं अद्याप समोर येऊ शकलेली नाहीत.

Mahayuti's Leader
Madhuri Misal : 'पर्वती मतदारसंघातून मीच लढणार', उमेदवारीवर माधुरी मिसाळ ठाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com