Mahayuti vs MVA : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 30 जागा मिळवत महाविकास आघाडीने महायुतीचे मोठे नुकसान केले. लोकसभेत मिळालेल्या विजयाने महायुतीचे विधानसभा निवडणुकीत टेन्शन वाढणार आहे.
कारण 48 लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 288 मतदारसंघापैकी 164 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेची दावेदार असणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (ठाकरे गट) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला रोखण्याचे काम केले. भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे दडपण महायुतीवर असेल. तर, महाविकास आघाडी सत्तेची प्रबळ दावेदार असणार आहे.
164 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे. तसेच 12 विधानसभा मतदारसंघात अगदी थोड्या फरकाने महाविकास आघाडीला लीड MVA गमवावे लागले आहे. कोकणातील 39 पैकी 27 मतदारसंघांमध्ये महायुतीत तर 12 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला लीड मिळाले. विदर्भातील 62 मतदारसंघापैकी 43 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने पुढे आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला 228 मतदारसंघात आघाडी होती. मात्र, विधानसभेला शरद पवारांच्या प्रचारसभांनी वातावरण बदलले. भाजपच्या जागा कमी झाल्या शिवाय शिवसेनेला सोबत महाविकास आघाडी देखील सत्तेत आली. त्याच प्रमाणे विधानसभेला चित्र बदलण्यासाठी महायुतीचे प्रयत्न राहतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.