Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये महायुती क्लीनस्वीप मिळविण्यासाठी खेळी खेळणार की मैदान प्रतिस्पर्ध्यांना सोपवणार?

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकची जागा नेमक्या कोणत्या पक्षाकडे राहील, याचे अनेक तर्क-वितर्क आता जनतेतूनही लढविले जात आहेत.
shantigiri maharaj rajabhu waje hemant godse
shantigiri maharaj rajabhu waje hemant godsesarkarnama

Nashik News : राज्यातील राजकीय परिस्थितीचा छोटा अंक नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष नाशिकच्या लोकसभेच्या जागेसंदर्भात ( Nashik Lok Sabha Constituency ) गेल्या 35 दिवसांपासून निर्णय घेऊ शकलेले नाहीत. सत्ताधारी पक्षातील प्रत्येक पक्ष नाशिकसाठी दावेदारी सांगत आहे. परिणामी महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) उमेदवार राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje ) हे एकमेव प्रमुख उमेदवार प्रचारात आहेत.

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शांतीगिरी महाराज ( Shantigiri Maharaj ) यांचाही प्रचार सुरु झाला आहे. मात्र, एकंदरीत परिस्थितीमुळे नाशिक लोकसभेचा चक्रव्यूह नेमका कोण भेदणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकची जागा नेमक्या कोणत्या पक्षाकडे राहील, याचे अनेक तर्क-वितर्क आता जनतेतूनही लढविले जात आहेत. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला 14 दिवसांचा कालावधी प्रचारासाठी पुरेसा आहे, असा विश्वास बहुदा महायुतीतील नेत्यांना असावा. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये घरोघरी पोहोचणं तसं जिकीरीचं काम असतं, हे राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना माहित आहे. आता कमी दिवस उरलेत, याचा धसका घेऊनच काही प्रमुख नेते माघार घेऊ लागले आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी तर कोणाचीही तरी एकदाची घोषणा करुन टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही दिली. घोषणा होत नसल्याने तिन्ही सत्ताधारी पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे.   

एवढा उशीर कशामुळे हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांच्या मते शिवसेना जागा सोडायला तयार नाही, तर शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांच्या मते जागा अजून आपल्याकडे आलीये; याची खात्री नाही, असे सांगण्यात येते. राष्ट्रवादी लढण्यासाठी तयार असली तरी मुंबई-दिल्ली यांच्यातील दुहेरी स्थितीमुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही, अशा स्थितीत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार असले तर अन्य पक्ष सहकार्य करतील का, हा प्रश्न आहे. किंबहुना अन्य दोन पक्षांसमोरही हाच प्रश्न रेंगाळत आहे. खूप उशीर झालेला असल्याने अजून चार दिवस जाऊ द्या, असा एक मतप्रवाह समोर येत आहे. राज्यस्तरीय वरिष्ठ नेत्यांच्या मते एवढ्या गोंधळात नाशिकच्या जागेची घोषणा केल्यास बंडखोरीला ऊत येऊ शकतो. त्यामुळे संभाव्य बंडखोरांना कोणतीही संधी मिळू नये, यासाठी दोन किंवा अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे तीन मे रोजी अधिकृत उमेदवाराची घोषणा करावी, असे ठरल्याचे समजते. 

shantigiri maharaj rajabhu waje hemant godse
Nashik Loksabha : 'वंचित'चे नाशिकमध्ये 'मराठा कार्ड', करण गायकर यांना उमेदवारी

लोकसभेसाठी फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांची मोठी जंत्री सोबत जोडावी लागते. मालमत्तेच्या कागदपत्रांसह अनेक प्रकारच्या एनओसी लागतात. सर्व प्रकारची सरकारी बिले वेळेत भरल्याच्या पावत्या सोबत लागतात. त्यामुळे नाशिकच्या संदर्भात सस्पेंस कायम ठेवून संबंधित अधिकृत उमेदवाराला फॉर्म भरण्याची तयारी करायला सांगायची, आणि त्याने शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दाखल करायचा असे ठरल्याचे वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांना स्पर्धेत उतरण्याची कोणतीही संधी मिळणार नाही. नाशिक लोकसभेची सगळीच गणिते मतांच्या विभागणीवर अवलंबून आहेत. एक गठ्ठा मते घेऊ शकणाऱ्या संभाव्य उमेदवारावर विजयी उमेदवार ठरणार आहे. नाशिक संदर्भातील ओढाताण अशीच सुरु ठेवली तर संभाव्य बंडखोरांना गाफील ठेवता येणे शक्य असल्याचे महायुतीत ठरले आहे.  

प्रत्यक्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जागेवरुन दावे सांगितले जात असताना तुलनेने भारतीय जनता पार्टीची काहीही हालचाल वरुन दिसून येत नाही. पण, आता काहीतरी शिजतंय. राजकीय गणिते मांडून नाशिकसाठी कोणता उमेदवार योग्य ठरु शकतो, यावर खलबते सध्या सुरु आहेत, हे नक्की. निवडून येण्याची क्षमता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. महायुतीसाठी पोषक असलेल्या नाशिकचा कल सध्या महाविकास आघाडीकडे दिसून येतो. कारण गेल्या 35 दिवसांपासून ते लोकांमध्ये आहेत. आता या सगळ्या परिस्थितीला पुरुन उरणारा उमेदवार निवडताना महायुतीची कसरत होणार हे स्वाभाविक आहे. महायुतीतील गोंधळाचा महाविकास आघाडी पुरेपूर फायदा घेत आहे. महायुती क्लीनस्वीप मिळविण्यासाठी खेळी खेळणार की मैदान प्रतिस्पर्ध्यांना सोपवणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


( Edited By : Akshay Sabale )

shantigiri maharaj rajabhu waje hemant godse
Nashik Loksabha Constituency: नाशिकमधून भुजबळांची माघार, पण अजित पवार गट अन् भाजपचं काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com