Nashik Constituency 2024 : भाजप, भुजबळ यांना झुंजवत अखेर हेमंत गोडसेच नाशिकचे उमेदवार

Hemant Godse Politics : खासदार गोडसे यांना नाशिकमधून महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोडसे उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Hemant Godse
Hemant Godse Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Shinde Group News: गेले महिनाभर सुरू असलेली नाशिक मतदारसंघाची Nashik Constituency उमेदवारी आज जाहीर झाली. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे Hemant Godse यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी आज उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीसाठी गोडसे यांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही अधिक संघर्ष सहकारी नेत्यांशी करावा लागला.

महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना आज उमेदवारी जाहीर झाली. त्यासाठी महिनाभर महायुतीचे तीनही पक्ष आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते एकमेकांशी झुंजत होते. ही झुंज नाशिक मतदारसंघाच्या वीस लाख मतदारांना अस्वस्थ करत होती. त्यापेक्षाही अधिक विद्यमान खासदार असूनही आणि उमेदवारीचे कमिटमेंट घेऊन ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलेल्या गोडसे यांना मनस्ताप करणारी होती. खासदार गोडसे उद्या दिंडोरीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार Bharati Pawar यांच्या समवेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने गेले वर्षभर अनेक इच्छुकांना मधाचे बोट लावून तयारी करण्यास सांगितले होते. यामध्ये प्रामुख्याने मतदारसंघ समन्वयक केदा आहेर, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांचा समावेश होता. भारतीय जनता पक्ष निवडणुकीची तयारी करीत असताना सातत्याने आपल्या सहकारी पक्षांना हिणवत होता. शिंदे गटाला हीन विण्याचे काम भाजपचे इच्छुक अतिशय जोमाने करीत होते. भाजपच्या या सर्व इच्छुकांनी हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या खासदार गोडसे यांनी काहीच विकास केला नाही, अशा प्रकारचे आरोप केले होते. ते अगदी कालपर्यंत सुरू होते. या सर्व स्थितीत आज हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारीचा गोडसे यांना आनंद होण्यापेक्षा 'याचसाठी केला होता अट्टहास' असे म्हणण्याची वेळ न येवो.

खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला सर्वप्रथम अपशकून झाला तो भाजपच्या शहरातील तीन्ही आमदारांनी विरोध केला तेव्हा. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते गेले वर्षभर निवडणुकीसाठी परिश्रम घेत होते. त्यामुळे त्यांनाही ही जागा सहकारी पक्षाला सोडणे त्रासदायक होते. त्यामुळे भाजपने शेवटच्या टप्प्यात अतिशय आक्रमक भूमिका घेत नाशिकचा मतदारसंघ भाजपाला सोडावा, असे प्रयत्न केले. त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी खरे तर खासदार गोडसे यांनी प्रचार देखील सुरू केला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या मार्गात शेवटच्या क्षणी राजकीय अडथळे निर्माण झाले.

Hemant Godse
Nashik Lok Sabha Election : मोठी बातमी : नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते NCP आणि राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा BJP प्रयत्न होता. यानिमित्ताने भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. भुजबळ हे राज्यस्तरीय नेते असल्याने स्थानिक स्तरावर त्यांना विरोध अशक्य होता. भुजबळ उमेदवारी असल्याने भाजपचा विरोध देखील मावळला होता. मात्र शिंदे गटाच्या स्थानिक नेते आणि खासदार गोडसे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली. त्यामुळे गोडसे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष काही काळ रंगला. यातून भुजबळ यांना पडद्याआडून मोठा विरोध झाला. त्यामुळे महिनाभर वाट पाहिल्यानंतर भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्याला उमेदवार म्हणून पुढे करण्याचे प्रयत्न होते. ते यशस्वी झाले नाही.

सोमवारी या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपला पूर्ण वेळ उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी खर्च केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन Girish Mahajan आणि भुजबळ यांचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या घडल्या. त्यातून हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाला. त्यातून खासदार गोडसे यांच्या उमेदवारीचा मार्ग बऱ्यापैकी मोकळा झाला होता.

Hemant Godse
Naresh Mhaske News : 'आमचे काम 365 दिवस सुरू त्यामुळे भीती वाटत नाही', नरेश म्हस्के यांची पहिली प्रतिक्रिया !

खासदार हेमंत गोडसे यांना आज उमेदवारी जाहीर झाली. मात्र शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी एका महिन्यापूर्वी त्यांना उमेदवार घोषित केले होते. त्याआधी त्यांनी प्रचार सुरू केला होता. परंतु उमेदवारीसाठी झालेल्या विरोधाने त्यांना या उमेदवारीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. हा संघर्ष स्वकीयांशी होता. याच स्वाकीयांना बरोबर घेऊन त्यांना प्रचारात उतरावे लागणार आहे. प्रचारासाठी अवघे सोळा दिवस आहेत. या सोळा दिवसात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन निर्माण करण्याचे मोठे काम त्यांना करावे लागेल.

गोडसे नाशिकमधून चौथ्यांदा उमेदवार आहेत. पहिल्यांदा मनसे दुसऱ्यांदा भाजप शिवसेना युतीतर्फे ठाकरे गटाचे आणि यंदा शिंदे गटाचे उमेदवार म्हणून ते मतदारांना सामोरे जात आहेत. त्यांच्या समर्थकांनी आज उमेदवारी मिळाल्याने आनंद व्यक्त केला. मात्र गोडसे यांना उमेदवारी द्यायचीच होती, तर महायुतीने दीड महिना चर्चा चर्वण करून वेळ वाया का घालवला? असा गंभीर प्रश्न मतदारांमध्ये आहे. याने महायुतीचे नेते कार्यकर्ते यापूर्वीच विस्कळीत झाले आहे. गोडसे यांचे समर्थक देखील प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या संपर्कात गेले आहेत. या सगळ्यांची झळ महायुतीला बसणार नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

खासदार गोडसे यांचा सामना महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आहे. माजी आमदार वाजे यांना महिन्यापूर्वी उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी सबंध मतदारसंघ पिंजून काढला आहे. वाजे यांच्या विरोधात बोलण्यासारखे प्रतिस्पर्ध्यांकडे काहीही नाही. त्यामुळे सबंध मतदार संघावर त्यांनी आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात ते बरेच पुढे गेले आहेत. हा प्रभाव मोडून काढणे गोडसे यांच्यासाठी आव्हान आहे. त्यात ते कसे यशस्वी होतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

Hemant Godse
Kolhapur Lok Sabha Election News : पंतप्रधान मोदींकडून समाज विभाजनाचा प्रयत्न; रमेश चेन्नीथला यांचा घणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com