Praful Patel : दिल्ली विमानतळावरील ‘ते’ काम प्रफुल पटेलांच्या काळातील; मोहोळांकडून चौकशीचे आदेश

Delhi Airport Accident Union Aviation Minister Praful Patel Modi Government : प्रफुल पटेल हे 2009 मध्ये यूपीए सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री होते. त्यांच्याच काळात टर्मिनल एकचे काम झाले होते.
Murlidhar Mohol Praful Patel
Murlidhar Mohol, Praful PatelSarkarnama

New Delhi : दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसाने विमानतळाच्या टर्मिनल एकवरील छताचा काही भाग कोसळून अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे आठ जण जखमी झाले आहे. त्यावरून आता राजकारण तापलं असून विरोधकांनी मोदी सरकारवर केली आहे.

अपघातग्रस्त इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन महिन्यांपुर्वीच उद्घाटन झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात हे काम 2009 मध्ये यूपीए सरकारच्या काळात झाल्याचे खुद्द तक्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांनीच सांगितले आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

Murlidhar Mohol Praful Patel
Video Rajya Sabha Session Live : राज्यसभेतच महिला खासदार बेशुध्द पडल्या; तातडीने रुग्णालयात केले दाखल  

प्रफुल पटेल हे 2009 मध्ये यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. दुर्घटनेनंतर मीडियाशी बोलताना पटेल म्हणाले, देशातील एका मोठ्या कंपनीने माझ्या देखरेखीखाली हे काम केले आहे. हे काम 15 वर्षांपुर्वी झाले होते. त्याचा खूप वापरही झाला. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्याआधीच त्याचे ऑडिट व्हायला हवे.

कोणतीही इमारत बांधत असताना काही निकष असतात. त्यामुळे 15 वर्षांपुर्वीच्या बांधकामावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आपल्याकडे आता केवळ सिमेंट-काँक्रिटच्या इमारती नाहीत, नवीन काळातील साहित्याचा वापर केलेल्या इमारतीही आहेत. त्यामुळे दुर्घटनेचे कुणी राजकारण करू नये, असेही पटेल यांनी सांगितले.

Murlidhar Mohol Praful Patel
Delhi Rain Update : पाण्यासाठी उपोषण करणाऱ्या मंत्र्यांच्या घरात घुसले पाणी; रेकॉर्डब्रेक पावसाने दाणादाण

दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच राम मोहन नायडू यांना पहिल्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी सकाळी घटनास्थळी जाऊ पाहणीही केली. यावेळी बोलताना त्यांनी डीजीसीएकडून दुर्घटनेचा चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच ही इमारत 2009 मध्ये बांधण्यात आल्याचे सांगत त्यांनी यूपीए सरकारकडे बोट दाखवले.   

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करत या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएला दिल्याचे म्हटले आहे. तसेच इतर विमानतळांवर तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मोहोळांनीही सकाळी घटनास्थळाची पाहणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com