Rupali Chakankar : असं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे की, चाकणकर भिडल्या? म्हणाल्या, 'मग, तुम्हाला लाज वाटते का?'

Rupali Chakankar On Supriya Sule : राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम (पॅटर्न) लागू करण्यात येणार आहे. यावरून राज्यात विरोध होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती.
Rupali Chakankar, Supriya Sule
Rupali Chakankar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम (पॅटर्न) लागू होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात घोषणा केली होती.

या घोषणेनंतर आता नवा वाद सुरू झाला आहे. याच घोषणेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तर ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची अंमलबजावणी म्हणजे राज्य शिक्षण मंडळ संपूर्णतः बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सुळेंच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पटलवार केला आहे. याबाबत चाकणकर यांनी एक्स आणि फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटलं आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर निशाना साधला आहे.

चाकणकर यांनी, महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत केलेच पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाना साधला आहे.

तसेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत सरकारी शाळेतील विद्यार्थी कुठेतरी कमी पडतो. मग हा अभ्यासक्रम सरकारी शाळेत लागु झाल्यावर तेथील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात क्रांती घडले यात शंका नसल्याचेही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Rupali Chakankar, Supriya Sule
Rupali Chakankar : '..हे माणसाच्या कळपातील विकृती', चाकणकरांची प्रतिक्रिया

तर केवळ अभ्यासक्रम लक्षात ठेवण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भर देणे गरजेचे आहे, हेच महत्वपूर्ण काम राज्य सरकारने केल्याचा दावा देखील चाकणकर यांनी केला आहे.

तसेच यावेळी चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना, काही राजकीय मंडळींना आपल्या शिक्षण संस्थांवर टाच येणार याची जाणीव झाल्यामुळेच त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम अचानक उफाळून आल्याचे म्हटलं आहे.

उगाच सरकारवर टीका करून सरकारचा नवीन डाव वगैरे असे शब्दप्रयोग करून सामान्य कुटुंबातील मुलं मुख्य प्रवाहापासून लांब कसे राहावेत, यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील जनतेची दिशाभूल केली जातेय असा दावा चाकणकर यांनी यावेळी केला आहे.

Rupali Chakankar, Supriya Sule
Rupali Chakankar News: '..त्यामुळे ती तरुणी आरोपीबरोबर गेली असावी', चाकणकरांना शंका

सुप्रिया सुळेंना या निर्णयामुळे महाराष्ट्राची ओळख पुसणार अशी शंका वाटते. मग संसदेत काम करत असताना तुम्ही मराठीतच का बोलत नाहीत? तिथे मराठी बोलताना लाज वाटते का? असा खरमरीत सवाल चाकणकर यांनी केला आहे. तसेच अभिजात भाषा मराठी, संस्कृती, परंपरा याचा विचार सुप्रिया सुळे करतात कारण त्या स्वतः व त्यांची मुले ही परदेशात शिकून आलेत! असाही टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com