Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचा फोन बंद; कोणत्याही क्षणी अटक? मंत्रिपदासोबत आमदारकीही जाणार, दमानियांच्या दाव्याने खळबळ

Manikrao Kokate Anjali Damania : माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे.
Manikrao Kokate Ajit Pawar
Manikrao Kokate Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका लाटल्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. माणिकराव कोकाटे यांनी अटक करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती आहेत. त्यातच कॅबिनेट बैठकीपूर्वी कोकाटेंचा फोन बंद लागत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा झाली असल्याने त्यांचे मंत्रिपदच काय पण आमदारकी देखील रद्द होत असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टाचा नियम देखील सांगितला आहे.

त्या म्हणाल्या, कोकाटेंना शिक्षे विरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे. मात्र, ती दाद मागत असताना त्यांचे मंत्रिपदच काय पण आमदारकी देखील कायम राहत नाही. कारण सेक्शन ८(४) हा कायदा ज्यामुळे अपील मधे गेल्यावर दिलासा मिळायचा हा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द (Ultra Vires) घोषित केला आहे. त्यामुळे ते अपील जरूर करू शकतात पण त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी संपली आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
BJP Candidate List : पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, भाजपची उमेदवार यादी फायनल; इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात!

अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले

आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याबाबत चर्चा झाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटे यांच्याकडील मंत्रिपद कोणाकडे द्यायचे याची विचारणा देखील अजित पवारांकडे केली आहे.

माणिकराव कोकाटे कॅबिनेटला गैरहजर

माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद असतानाच ते आज होत असलेल्या कॅबिनेट बैठकीला देखील गैरहजर राहणार आहेत. दरम्यान, कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार काय कायम आहे. निवडणुकीच्या आधी कोकाटेंना अटक झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
Pradnya Satav news : मोठी बातमी : काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार? अधिवेशनादरम्यान काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com