Rummy Controversy : छावा संघटनेच्या घाटगेंवरील हल्ल्यामागे सुरज चव्हाण नाही तर 'तटकरेंचं' ब्रेन : मनोज जरांगे पाटलांचा बॉम्ब

Rummy Controversy : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या विजय घाटगे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
Manoj Jarange blames Tatkare for Latur assault
Manoj Jarange blames Sunil Tatkare for Latur assaultSarkarnama
Published on
Updated on

Rummy Controversy : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ट्विट केला. यावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असताना काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या विजय घाटगे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही दंड थोपटले आहेत. आपण विजय घाटगेंची लातूरमध्ये जाऊन भेट घेणार असून त्यांना खंबीर साथ देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी जरांगे यांनी थेट तटकरेंवर आरोप केले असून ही मारहाण त्यांनीच घडवून आणल्याचा दावा केला आहे. सुरज चव्हाण यांनी मारहाण जरी केली असली तरी या मागे तटकरेंचं ब्रेन आहे. त्यांनीच हा हल्ला घडवून आणला असावा. त्यांच्या मनात शेतकऱ्यांच्या विषयी तिरस्कार आणि जातिवाद भरलेला आहे असाही दावा जरांगे यांनी केला आहे.

जरांगे पाटील म्हणाले, आता कुठे अजित पवार यांचा पक्ष महाराष्ट्रात मजबूत होत आहे. त्यांच्या पक्षाला युवकांची साथ मिळत आहे. पण काही नाकर्ते कार्यकर्ते आणि नेते अजित पवार आणि त्यांचा पक्ष अडचणीत आणत आहेत. सुरज चव्हाण याने ज्या पद्धतीने एका शेतकऱ्याच्या मुलावर शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारल्यामुळे हात टाकला ते चुकीचं आहे. त्या पोरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले, त्यात कुठं काय चुकलं? असा सवाल केला आहे.

Manoj Jarange blames Tatkare for Latur assault
Amit Deshmukh On Rummy News : कृषीमंत्री सभागृहात रमी खेळत होते, खरे काय खोटे काय? विधानसभा अध्यक्षांनीच सांगावे!

आता अजितदादा असो किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असो यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी. ज्या लोकांनी विजय घाडगे यांच्यावर हात उचलला त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. अजित पवार यांनीही अशा नाकर्ते कार्यकर्ते आणि नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. फक्त हकालपट्टीच करू नये तर त्यांचा राजीनामा घेऊन पक्षाकडूनच यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशी मागणी केली आहे. तसंच कृषीमंत्री कोकाटे यांनी पदाची गरिमा राखावी, स्वतःत बदल करावा, अन्यथा शेतकरीच त्यांच्या अंगावर जातील असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com