Congress News : गोवा काँग्रेसच्या बैठकीत माणिकराव ठाकरेंची कोंडी, कार्यकर्त्यांनी धरले धारेवर

Manikrao Thakare Goa Congress : गोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी माणिकराव ठाकरे यांनी या बैठकीत निवडणूक तयारीवर भर दिला. तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील घेतला.
Manikrao Thakare
Manikrao Thakaresarkarnama
Published on
Updated on

Congress News : माणिकराव ठाकरे हे गोवा राज्याचे काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यांनी काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश देण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच नेत्यांमधील प्रखर मतभेद उघड झाले.

तब्बल दीड वर्षाने काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची आठवण का झाली, अशी विचारणा करत या बैठकीत गोंधळ घालण्यात आला. तसेच मागील बैठकीत घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि या बैठकीसाठी सुचविलेले भलतेच विषय यावरून अनेकांनी प्रभारींना आणि पदाधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

काँग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह गोवा काँग्रेसचे सचिव प्रभारी, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

Manikrao Thakare
Sudhir Mungantiwar News :'चौथीत 50 वेळा नापास होणारा, 'Phd'च्या विद्यार्थ्यास ज्ञान शिकवणार असेल, तर ...' ; मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला!

गोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी माणिकराव ठाकरे यांनी या बैठकीत निवडणूक तयारीवर भर दिला. विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. तसेच बैठकीत

एल्विस गोम्स यांनी सांगितले की, दीड वर्षानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच काही ना काही समस्या आहेत आणि त्या मांडताना चर्चा होणारच. तर

सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले की, माझ्या विषयांवर चर्चा करण्याची मला संधी मिळाली नाही. कारण माझ्यापेक्षा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले मुद्दे मांडले. दीड वर्षांनंतर बैठक झाल्यामुळे नाराजी साहजिकच आहे.

Manikrao Thakare
One Nation One Election : मोदी सरकारच्या 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला 'या' नेत्याने दर्शवला पहिला विरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com