One Nation One Election : मोदी सरकारच्या 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला 'या' नेत्याने दर्शवला पहिला विरोध

Election News: देशात पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचे वारे वाहणार आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून या विरोधात पावले उचलली जात आहेत.
Narendra Modi One Nation One Election
Narendra Modi One Nation One ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पुढील आठवड्यात हे विधेयक मांडले जाऊ शकते. त्यामुळे देशात पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचे वारे वाहणार आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून या विरोधात पावले उचलली जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या विधयेकाला विरोध दर्शवणारे ते विरोधी पक्षाचे पहिले नेते आहेत. (Prakash Ambedkar News )

'वन नेशन, वन इलेक्शन' असा कायदा करण्याचा अधिकार मंत्रिमंडळ आणि संसदेला आहे का? हाच मोठा प्रश्न आहे. वन नेशन वन इलेक्शन नुसार 6 महिन्यानंतर इलेक्शन घेता येते. पण आपल्याकडे कायद्यानुसार 6 महिन्यांच्या आतमध्ये इलेक्शन घ्यावे लागते. पाच वर्षांचं इलेक्शन फिक्स करणं म्हणजे पाच वर्षे हुकुमशाही आणणं असेच असून पाच वर्षांसाठी लोकशाही संपली. सुप्रीम कोर्ट याला विरोध करेल असे मला वाटते, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले.

Narendra Modi One Nation One Election
Uddhav Thackeray Video : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा फोन, नेमंक कारण काय?

यासाठी जी बेंच असणार आहे. त्यामध्ये संविधानिक ज्यांचा अभ्यास असेल त्यांना त्यामध्ये घ्यावे. आमचा 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोध असणार आहे. हे लोकशाही विरोधी कायदा असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच शरद पवार (Sharad Pawar)यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. याबाबत त्यांना विचारले असता तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यावर कोणी बोलू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Narendra Modi One Nation One Election
Ambadas Danve : राजकीय दबावात काम करु नका, अंबादास दानवेंनी घेतली बीड एसपींची भेट!

परभणी येथे झालेली घटना ही EVM वरून लक्ष हटवण्यासाठी केली गेली असावी. मी हे नाकारत नाही सरकारने जे निर्देश द्यायला हवे होते, ते दिले नाहीत. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. यावर कोणाचं नियंत्रण नाही असेही यावेळी आंबडेकर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणं झाले आहे. त्यांना सांगितले आहे की परभणी येथील कोंबिंग ऑपरेशन थांबवा. तुम्हाला जी लोकं हवी आहेत, त्यांची नावे द्या. आम्ही त्या सगळ्यांना तुमच्या समोर आणतो. तुम्ही कोर्टात सादर करा. पण लाठीचार्ज कोंबिंग ऑपरेशन थांबवा, असे मी त्यांना सांगितले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी IG यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मला IG कडून फोन आला. त्यांना देखील मी तेच सांगितले. ते तयार झाले असल्याचे यावेळी आंबेडकर म्हणाले.

Narendra Modi One Nation One Election
Ambadas Danve : देशमुख यांच्या हत्येचा तपास जिल्ह्याबाहेरील पोलिस यंत्रणेकडून व्हावा!

राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने आले आहे. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी वेळा लागला. तर मुख्यमंत्री फडणवीस व दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन आठ दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप अद्याप न होणे ही गंभीर बाब आहे, असा आरोपही यावेळी प्रकाश आंबडेकर यांनी केला.

Narendra Modi One Nation One Election
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या, 'विधानसभेच्या तीनही निवडणुकीत पक्षाचे काम केलंय...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com