‘मालिकेत काम देतो,’ असे सांगून मनोहर भोसलेने केला बलात्कार

भोसले याला सात दिवसांची पोलिस कोठडी 
Manohar Bhosale
Manohar BhosaleSarkarnama
Published on
Updated on

करमाळा (जि. पुणे) : करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले यास करमाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश आर. ए. शिवरात्री  यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून त्यास सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, ‘एका मालिकेत काम देतो,’ असे सांगून भोसले याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. (Manohar Bhosale remanded in police custody for seven days)

बारामती आणि करमाळा पोलिस ठाण्यात ता. 9 सप्टेंबर या एकाच दिवशी भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर रविवारी (ता. १९ सप्टेंबर) करमाळा पोलिसांनी भोसले यास ताब्यात घेतले आहे. आज करमाळा न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे .

Manohar Bhosale
अजित पवारांची मोठी घोषणा : ‘माळेगाव’चा पुढचा अध्यक्ष तावरे आडनाव सोडून असेल!

मनोहर भोसले याला करमाळा   न्यायालयात आणले, तेव्हा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करमाळा पोलिस ठाणे ते न्यायालय हे अंदाजे अर्धा किलोमीटरचे अंतर आहे. न्यायालय परिसर आणि पोलिस ठाणे परिसरात कडक बंदोबस्त होता. न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. सचिन लुणावत यांनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दुपारी पावणे एकच्या सुमारास भोसले याला न्यायालयात आणले होते.

Manohar Bhosale
पवारच पाठीशी नसल्यामुळे मुश्रीफांची तब्येत बिघडली असावी

‘एका मालिकेत काम देतो,’ असे सांगत पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप भोसलेवर आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 10 दिवसांची पोलिस कोठडी तपास अधिकारी कोकणे यांनी मागितली होती. अॅड. लुणावत यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. दोन आरोपी फरारी आहेत, त्यांचा तपास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. मनोहर भोसलेच्या वकिलांकडून न्यायालयीन कोठडी मागण्यात आली होती. अॅड. हेमंत नरुटे व अॅड. विजय गायकवाड यांनी भोसले याची बाजू न्यायालयात मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com