Manoj Jarange: मनोज जरांगे हे संविधानिक तरतुदीच्या बाहेर जाऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. हा त्यांचा बालहट्ट असून ही मागणी कधीही पूर्ण होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या आमदारानं मांडली आहे. त्यामुळं आता सरकारनं यावर आपली भूमिका स्पष्ट करते की जरांगेंच्या मागणीवर काही तोडगा निघतोय हे पाहावं लागणार आहे.
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जरांगेंवर टीका करताना त्यांची मागणी म्हणजे बालहट्ट आहे असा उल्लेख केला. फुके पुढे म्हणाले, "मराठा सामजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे वारंवर करत आहेत आणि हे त्यांनाही माहिती आहे की हे शक्य नाही. संविधानाच्या बाहेर जाऊन कोणतंही राज्य किंवा केंद्र सरकार आरक्षण देऊ शकणार नाही, जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी हे समजून घेतलं पाहिजे. त्यांनी मराठा समाजच्या भल्यासाठी EWS मधील आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे.
तिथं त्यांना नोकरी आणि शिक्षणातला लाभ जरुर मिळेल. ४९ हजार ज्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांवर वारंवार आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळं या सर्व नोंदींची चौकशी झाली पाहिजे. कारण यामध्ये अनेक नावं ही पुन्हा पुन्हा आलेली आहेत. तसंच जर दबावाखाली या नोंदी केल्या गेल्या असतील तर संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे.
जरांगे आता जाहीर व्यासपीठावरुन मुख्यमंत्री फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत आहेत. यावर बोलताना फुके म्हणाले की, जरांगेंनी जेव्हा या आंदोलनाची सुरुवात केली तेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. पण त्यांच्या या अशा वागण्यामुळं त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी होत आहे. आता ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, जरांगेंनी अशा प्रकारे शिवीगाळ करु नये. असंविधानिक भाषेचा वापर करु नये, तसंच आमच्या नेत्यांवर टीका करु नयेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.