Abdul Sattar : 'सरकार, मुंबई अन् CM फडणवीसांचा 'वर्षा' बंगला आम्हाला...'; 'पॅचअप'साठी गेलेल्या शिवसेनेच्या सत्तारांसमोरच जरांगेंनी वात पेटवली

Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच ते आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचेही सांगितले. चुका दुरूस्त करा अन् मराठा-कुणबी प्रमाणपत्र रद्द करू नका, या मागणीचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला.
Abdul Sattar Manoj Jarange Patil .jpg
Abdul Sattar Manoj Jarange Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखणे

Jalna News: सरकारकडून काही चुका झाल्या असतील, शिंदेसाहेबांचे तुमच्या बद्दल खूप चांगले मत आहे, त्यांनी सर्वोत्तपरी तुम्हाला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली आहे. तुम्ही संघर्ष योद्धा आहात, उपोषण न करता सरकारशी चर्चा करावी, तुम्ही केवळ मराठाच नाही तर सर्व समाजासाठी महत्त्वाचे आहात, अशी साद शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जरांगे पाटलांना घातली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच ते आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचेही सांगितले. चुका दुरूस्त करा अन् मराठा-कुणबी प्रमाणपत्र रद्द करू नका, या मागणीचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला.

अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या या अचानक भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील हे पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहे. तत्पूर्वी 28 रोजी सरकारच्या वतीने चर्चेसाठी सकारात्मक पावलं उचलावी, असे आवाहन जरांगे यांनी यापुर्वीच केले आहे.

जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, सरकार तुमच्या मागणीसाठी सकारात्मक विचार करत आहे, असे अब्दुल सत्तार यांनी या भेटीत सांगीतले. आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नाही, तर तुमचे वैयक्तिक मित्र म्हणून आलो आहोत, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले. या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही आमची भावना सत्तार यांना सांगीतली. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमाणपत्र रद्द करायला नको होते.

Abdul Sattar Manoj Jarange Patil .jpg
Abdul Sattar: एकनाथ शिंदे, शिरसाट, भुमरेंवर हल्ला होताच, अब्दुल सत्तार पॅचअपसाठी धावले!

ओबीसीचे मुंबई येथे आंदोलन आहे, आम्ही अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहोत. सरकारने काही डाव टाकला तर मात्र आम्ही मुंबईला जाणार. सरकार, मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा वर्षा बंगला आम्हाला बघायचा आहे, असे जरांगे पाटील यांनी सत्तारांना सांगितले.

यावर सत्तार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या मागणी करिता सकारात्मक विचार करत आहे. मागील अडीच वर्षात सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जरांगे यांनी उपोषण करू नये, असे आवाहन केले. सरकार मराठा समाजाचे नुकसान करत आहे प्रमाणपत्रे रद्द होत आहे, व्यवसाय करिता कर्ज उपलब्ध होत नाही, महामंडळाचे परतावे मिळाले नाही, मुलींना मोफत शिक्षण मिळाले नाही, सरकारच अध्यादेश काढते व रद्दही करते. सरकारने आम्हाला वेड्यात काढू नये, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे नुकसान होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री तुमच्या सोबत चर्चा करतील, तुम्हाला बोलतील, तुमचं काम समाजासाठी आहे सरकार तुमच्या मागणी बाबत सकारात्मक आहे. समाजाला न्याय सरकार शिवाय मिळणार नाही, असे अब्दुल सत्तार यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com