Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असतानाच त्यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पोहोचण्यापूर्वीच जरांगे यांच्या आंदोलनासमोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे.
एमी फाऊंडेशनकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2025 मध्ये मनोज जरांगे यांच्या मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळीही याच संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती. यावेळीही आझाद मैदानावर होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याची माहिती आहे.
याचिकेत नेमकी काय मागणी?
एमी फाऊंडेशनच्या याचिकेत मुंबई शहरातील सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागांवर आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि भाविकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास वाहतूक आणि सार्वजनिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
याचिकेत सार्वजनिक सभा, आंदोलने आणि मिरवणुका यांच्यासाठी लागू असलेल्या 2025 च्या नियमांचा संदर्भ देण्यात आला आहे. आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्ते किंवा जागा दीर्घकाळ व्यापता येणार नाहीत, असा मुद्दा मांडण्यात आला आहे.
गेल्या वर्षीच्या जरांगे आंदोलनाच्या वेळी मुंबईतील विविध भागांमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्याचा मुद्दाही न्यायालयीन कार्यवाहीत समोर आला होता. त्यावेळी सार्वजनिक वाहतूक आणि शहरातील हालचालींवर परिणाम झाल्याचे निरीक्षण न्यायालयासमोर मांडण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.