

Ajay Baraskar Complaint : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने आरोप करणारे अजय बारस्कर यांनी आज अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी कालच येत्या ७ डिसेंबर पासून राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन चोवीस तास उलटत नाहीत, तोच अजय बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली.
अजय बारस्कर हे मंगळवारी अंबड पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मनोज जरांगे यांनी उपोषणा दरम्यान जालन्याच्या महिला जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप केला. त्यांचे हे वक्तव्य अशीमा मित्तल यांच्यासह महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे होते. तसेच मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील तरुणांना फाशी घेण्यासाठी प्रवृत्त करतात, असा आरोपही अजय बारस्कर यांनी केला.
अजय महाराज यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने जालना पोलिसांनी बारस्कर महाराजांना पुराव्या सह सक्षम हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज अजय बारस्कर महाराज पेन ड्राईव्ह घेऊन पुराव्यासह जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले. यावेळी अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याविरोधात अत्यंत खालच्या दर्जाची आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे कसे गरजेचे आहे? हे पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अजय बारस्कर यांनी पुरावांच्या एक पेनड्राईव्ह पोलिसांकडे सोपवला. यावर आता अंबड पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील आणि कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांच्यातील वाद हा प्रामुख्याने मराठा आरक्षण आंदोलनातील निर्णयप्रक्रिया, बंद दाराआड झालेल्या बैठका आणि जरांगे यांच्या नेतृत्वशैलीवरून निर्माण झाला होता. हा वाद फेब्रुवारी २०२४ मध्ये उघडपणे समोर आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.