Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा गनिमी कावा, मराठा आंदोलक मुंबई गाठणार?

Manoj Jarange Mumbai Protest Reservation : मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत. मात्र, त्याच वेळी मराठा आंदोलक मुंबईत धडकणार असल्याची चर्चा आहे.
Manoj Jarange patil
Manoj Jarange patilsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला उपोषण करणार आहेत. अंतरवाली सराटी येथे ते उपोषण करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते उपोषण करत असतानाच मराठे मुंबई गाठणार असल्याची रणनीती आखली जात आहे. गनिमी कावा सरकार विरोधात वारला जाणार असल्याची चर्चा आहे.

मराठा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी केली. येथे आंदोलनासाठी परवानगी देखील मागण्यात आली आहे.आझाद मैदानाची पाहणी करून सरकारवर दबाव टाकला जात असल्याचे देखील सांगितले जात आहे.

सरकारमधील मंत्री मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत. मात्र, ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. ते म्हणाले, 29 ऑगस्टला उपोषण करणारच. सरकारला वेळ वाढवून देणार नाही.

'आम्ही राज्यघटनेच्या बाहेर जाऊन काही मागत नाही. गॅझेट रोखू शकत नाही, नोंदी सापडल्या आहेत त्यानुसार आरक्षण द्या. ही आमची मागणी आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यानुसार आरक्षण मागत आहोत.आमची फसवणूक होतेय हे आमच्या लक्षात आलाय. मी जातवान आहे विरोध करणाऱ्यांना सोडत नाही', असे देखील त्यांनी सांगितले.

Manoj Jarange patil
Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची बाजू मांडताना थेट मुद्द्यालाच हात घातला

छगन भुजबळांच्या बदललेल्या भूमिकेविषयी ते म्हणाले, 'ओबीसी नेत्यांना मराठा मतांशिवाय जिंकता येत नाही. ओबीसी नेत्यांनी मराठा कुणबींचे वाटोळं करू नये. कुणबी आणि मराठे दोघे छगन भुजबळांना मतदान करतायत.भुजबळ निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की जरांगे माझे मित्र आहे.'

Manoj Jarange patil
Maratha-Kunbi Certificates : मनोज जरांगेंच्या दाव्यातील सरकारने हवाच काढली; वैध मराठा-कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारीच दाखवली, मराठवाड्यातही तब्बल 20 हजार....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com