Manoj Jarange Demands : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू, सरकारचे टेन्शन वाढणाऱ्या 'या' आहेत 13 मागण्या!

Hunger Strike Government Under Pressure : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये आपले उपोषण सुरू केले आहे. त्यांनी आपल्या लेखी मागण्या सरकारला आधीच दिल्या आहेत. तब्बल 13 मागण्या त्यांनी केल्या आहेत.
Manoj Jarange Demands
Manoj Jarange Demands sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आपले उपोषण सुरू केले आहे. हा आपला शेवटचा लढा असल्याची भावनिक साद देखील त्यांनी घातली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आपल्या लेखी मागण्या सरकाला दिला आहेत. त्यावर फक्त आता जीआर काढून चालनार नाही तर त्याची अंमलबजावणी देखील तत्काळ सुरू केली पाहिजे. तरच आंदोलन मागे घेऊ. सरकार चर्चेला आले तर त्यांचे स्वागत करू आणि नाही आले तर आमचे आंदोलन सुरूच ठेऊ असे देखील ते म्हणाले.

आम्ही तीन वर्षापासून आमच्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत. मात्र, ते वेळकाढूपणा काढत आहे. आम्ही तीन वर्ष वेळ दिला. पण यांच्या नियतीत खोट आहे. त्यामुळे अंमलबजावणीशिवाय माघार नाही, वेळ पडली तर मुंबईला जाऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

Manoj Jarange Demands
Manoj Jarange Hunger Strike : जात पडताळणी समित्याच बरखास्त करा, मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकले; उपोषण सुरू

मनोज जरांगे पाटील यांच्या 13 मागण्या

1) निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदी त्या नोंदीची कुणबी प्रमाणपत्र सर्वाच्या सर्व तात्काळ वाटप कराव...

2) हैदराबाद गॅझिटिअरचा फक्त जीआर काढण्यात आलाय. गॅझिटिअरमध्ये असलेल्या संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यातच आले नाहीत कुणबी नोंदीच्या संख्येनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावं आणि याची व्हॅलिडीटी कशी देणार हे पण लगेच स्पष्ट कराव...

3) सातारा संस्थान गॅझेटटियर, कोल्हापूर संस्थान गॅझेटटियर, औंध -पुणे -बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटटियर तात्काळ जीआर काढून लगेचच अंमलबजावणी करावी...

4) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावीत, अंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घ्यावे.

5) मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजासाठी लगेच स्थापन करावे.

6) ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत त्यांना आजची आज कुणबी प्रमाणपत्र द्यावं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्यांना लगेचच व्हॅलिडिटी द्यावी.

7) मराठा समाजाला ही ओबीसींच्या सर्व सवलती सोयी सुविधा देण्याचा जो जीआर काढण्यात आला त्या जीआरची अंमलबजावणी करावी.

8) सारथीच्या सर्व योजना सुरू करण्यात याव्यात पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचे पैसे तात्काळ द्यावे होस्टेलच्या सुविधा पण द्या...

9) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना तात्काळ नोकरी द्यावी आर्थिक निधी लगेच द्यावा.

10) शिंदे समितीला पुन्हा कुणबी नोंदणी शोधण्यासाठी आजपासूनच रेकॉर्ड तपासण्याचे सांगावे.

11) EWS/SEBC/ESBC मधून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना आजचे आज नियुक्त द्याव्या.

12) मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत वाहने दिली त्यातूनच व्याज परतावा सरकारने दिले नाहीत.त्या व्याज परताव्याची सपूर्ण रक्कम आजच्या आज द्यावी.

13) सगे- सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.

Manoj Jarange Demands
Manoj Jarange Patil : 'तर' फडणवीस अन् विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल : मनोज जरांगे पाटलांचा गर्भित इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com