
Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे. आंदोलनासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. सरकारने अवघ्या एका दिवसाची परवानगी आंदोलनासाठी दिली आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल एक महिन्याचे साहित्य सोबत घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे एका दिवसाची परवानगी असली तरी महिनाभराच्या तयारीने मराठा आंदोलक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गनिमी काव्याप्रमाणे जरी एका दिवसाची परवानगी असली तरी महिनाभर तरी हटायचे नाही, असा निर्धार मराठा आंदोलकांनी केला आहे. आझाद मैदानावर अवघ्या पाच हजार आंदोलकांना परवानगी आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज पाच हजार, उद्या पाच हजार आणि परवा पाच हजार असे आंदोलक येत राहतील. त्यामुळे एका दिवसात आंदोलन मागे घेतले जाणार नाही, हे स्पष्ट दिसते आहे.
आंदोलनात सहभागी झालेले नांदेड जिल्ह्यातील धोत्रा येथील कृष्णा सुर्यवंशी यांनी सांगितले की, धोत्रा येथून मंगळवारी (ता. २६) रात्री निघालो. बुधवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे पोचलो. गावातून २० जण आंदोलनात आलो आहोत. सोबत महिनाभर पुरेल असा किराणा आणि इतर साहित्यही आणले आहे. तर, आंदोलनात सहभागी झालेले हिंगोलीतील वसमत तालुक्यातील एकनाथ इंगोले म्हणाले, महिनाभर पुरेल एवढा किराणा, गहू, ज्वारी घेऊन मुंबईला निघालो आहोत. मनोज जरांगे 'परत चला' म्हणतील तेव्हाच आम्ही परतू. शेतीची कामे होत राहतील. घरातून एक व्यक्ती याप्रमाणे आम्ही गावातून वीस जण आलो आहोत.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईला पोहोचण्याआधीच भाजपच्या वतीने बॅनरबाजी करत त्यांनी आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेला हा बॅनर भाजपमधील मराठा नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांची नावे आहेत. त्यामुळे जरांगेंच्या विरोधात भाजपने मराठा नेतेच मैदानात उतरवले आहेत. या नेत्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर इतिहास हा शिव्यांना लक्ष्यात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असे म्हणत मराठा समाजाला पहिल्यांदा देवेंद्र फडणवीससाहेबांनी आरक्षण मिळवून दिले असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.