ShivSena Vs Thackeray Group : काम फुकटचं, पण श्रेयवादावरून उभे ठाकले शिवसेनेचे दोन्ही गट

Nashik Shiv Sena Vs Thackeray Group : सीएसआर निधीतून होणाऱ्या नाशिकमधील जॉगिंग ट्रकचा भूमिपूजन सोहळा होण्यापूर्वीच वादात
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सीएसआर निधीतून होणाऱ्या जॉगिंग ट्रॅकचा भूमिपूजन सोहळा होण्यापूर्वीच हे काम वादात सापडले आहे. प्रकल्पाची संकल्पना कोणाची अन् श्रेय कोण घेतो, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ऐन भूमिपूजन सोहळ्यापूर्वीच ठाकरे गटाने जागेचे अतिक्रमण आणि मोजणी असे मुद्दे पुढे करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे उद्या या जॉगिंग ट्रॅकचा भूमिपूजन सोहळा पार पडणार याची शाश्वती देण्यात आली. विकासकामार्फत मोफत होणाऱ्या महापालिकेच्या या प्रकल्पावरून शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असून, कोणाची सरशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (ShivSena Shinde Group Vs ShivSena Thackeray Group In Nashik)

याबाबत बोलताना शिवसेनेच्या (ShivSena) सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबा गायकवाड यांनी सांगितले, दोन वर्षांपूर्वी विकासकामार्फत या इंडिगो जॉगिंग ट्रॅकचे काम हाती घेण्यास महापालिकेने हिरवा कंदील दर्शवला. संबंधित विकासकाची बांधकाम साईड याच ठिकाणी असून, तब्बल दोन वर्षांपासून या जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू झाले नाही.

याबाबत सत्कार्य फाउंडेशनने वेळोवेळी महापालिकेकडे पाठवपुरावा केला. विकासकाने स्वत: रस दाखवल्यामुळेच महापालिकेने अर्थसंकल्पात या प्रकल्पाबाबत कोणतीही तरतूद केली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Manoj Jarange Speech : शरीर साथ देईना, पाय सुजले, वात आला... ; जरांगेंच्या भाषणाने जनसमुदाय भावूक!

याचा फटका या भागातील नागरिकांना बसला. आमच्या पाठपुराव्यामुळे आता भूमिपूजन होणार असले तरी काम विकासकाचे अन् जाहिरात शिंदे गटाची कशी, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. ही जागा पाटबंधारे विभागाची असून, महापालिकेने या जागेची योग्य ती मोजणी करून घेणे अपेक्षित आहे. तसे निवेदनही महापालिकेला देण्यात आले आहे.

यापूर्वी आरडी सर्कलबाबत असेच झाले. आमच्या माध्यमातून नागरिक रस्त्यावर आले. आंदोलन झाले. त्यानंतर विकासकाने काम सुरू केले. मात्र, शिंदे गटाने कोणताही संबंध नसताना लोकार्पण सोहळा पार पडला. आताही तशीच परिस्थिती आहे. मात्र, येथे नियमबाह्य पद्धतीने काम झाल्यास वा अतिक्रमण झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला, तर भूमिपूजन सोहळा पार पडेल, एवढीच प्रतिक्रिया शिंदे गटाकडून (Shinde group) देण्यात आली.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला; कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com