Manoj Jarange Patil Update : दुसरेही आंदोलन, पाचच वाहने, पार्किंग कुठे, कारवाईचा इशारा..! वाचा जरांगेंच्या आंदोलनासाठी पोलिसांची नियमावली...

Manoj Jarange Patil Gets Permission for Azad Maidan Protest : नियमावलीतील नियम क्रमांक पाचनुसार, ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलिसांसी विचारविनिमय करून परवानगी देण्यात येईल.
Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis News
Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police Allow Only One-Day Protest With Conditions : मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली आहे. पण ही परवानगी एक दिवसासाठीच असणार आहे. त्यासाठीही विविध अटी घालण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तशी नियमावलीच त्यांना धाडली आहे. या नियमावलीच्या बाहेर गेल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने आझाद मैदानावर विविध आंदोलने, सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका आदींसाठी राखीव भाग निश्चित कऱण्यात आला आहे. या नियमावलीनुसारच मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यातील पहिलाच महत्वाचा नियम म्हणजे, आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.

वाहनांसाठी नियम

नियमावलीतील नियम क्रमांक पाचनुसार, ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून परवानगी देण्यात येईल. तसेच आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडींबदर जंक्शनपर्यंत येतील. यापुढे मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहने आझाद मैदान येथे जातील. व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्किंगसाठी नेण्यात यावीत.

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis News
‘शिवतीर्थ’वर बाप्पासमोर ठाकरे बंधूंनी जोडले हात; 22 वर्षांची प्रतिक्षा संपली, पाहा खास फोटो...

आंदोलकांची संख्या

नियम क्रमांक सहानुसार, आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक आहे. तसेच आपल्या अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुध्दी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. त्यांचा आंदोलनाचा हक्कही बाधित करता येणार नाही, त्यामुळे पाच हजार आंदोलकांमध्ये त्यांचाही समावेश असेल. त्यामुळे त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही, असे नियम क्रमांक आठमध्ये नमूद करण्यात आले आहे. आंदोलनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच निश्चित क्षेत्रात अन्न शिजवता येणार नाही किंवा केर-कचरा टाकणार नाही, असे नियमही लागू करण्यात आले आहेत.

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis News
Manoj Jarange Patil Update : मनोज जरांगेंचे टार्गेट फक्त फडणवीस का? बावनकुळे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका

आंदोलनाच्या कालावधीदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे, त्यानुसार श्री गणेश विसर्जनदरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याप्रकारेच आपणाकडून किंवा आपल्या आंदोलकांकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपल्या आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृध्द व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश व नियमावलीच्या अधीन राहून आपणांस शांततामयरीत्या आंदोलनाची सशर्त परवानगी देण्यात येत आहे. परंतू आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास अथवा इतर प्रचलित कायद्याचा भंग केल्यास सदरचे आंदोलन हे बेकायदेशीर घोषित करून उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com