Maratha Politics : मराठा आंदोलनात फूट? मनोज जरांगे पाटलांचे वाढले टेन्शन, लढ्यात एकाकी!

Manoj Jarange Patil Maratha Protest Divided :मनोज जरांगेंनी जानेवारी महिन्यात उपोषणास्त्र उपसले मात्र सरकारकडून हवा तसा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळाला नाही.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Maratha Politics News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मागील एका वर्षापासून सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे,यासाठी ते आग्रही आहेत. त्यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली. मात्र, विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसला नाही. त्यामुळे मनोज जरांगेंची जादू संपली की काय? अशी चर्चा सुरू झाली.

ज्या देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंनी टोकाचा विरोध केला होता ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. त्यामुळे जरांगे मराठा आरक्षणासाठी आणखी आक्रमक होत सरकारला जेरीस आणतील, अशी शक्यता होती. मात्र, मनोज जरांगेंनी जानेवारी महिन्यात उपोषणास्त्र उपसले मात्र सरकारकडून हवा तसा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळाला नाही.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : सरकारला फूटणार घाम, तब्बल 42 मराठा संघटना एकवटल्या; मनोज जरांगे पाटील अलिप्त?

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला नवीन तारीख देत उपोषण स्थगित केले. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका मराठा संघटनांना पटत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी तब्बल 42 संघटना एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूरमध्ये या संघटनांची मराठा परिषद संपन्न झाली. तसेच मराठा समाजात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांचे नेतृत्व पुढे आल्याने मनोज जरांगे पाटील एकाकी पडल्याची देखील चर्चा आहे.

या परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या काही नेत्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतात मात्र सरकारशी संवाद साधत नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे समाजाचे नुकसान होत आहे. त्यामुळे मागील 25 वर्षांपासून समाजासाठी लढणाऱ्या संघटना एकत्र आल्या आहेत.

मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. मात्र, त्यांना बाजुला ठेऊन 42 संघटना एकत्र आल्याने मराठा संघटनांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. या 42 संघटनांमध्ये मराठवाड्यात प्रभावी असलेली विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना ज्योती मेटे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. त्यामुळे मराठवाड्यात देखील जिथे मराठा आरक्षणाचा सर्वाधिक प्रभाव आहे तेथेच फूट पडली आहे का? अशी चर्चा आहे.

मराठा आंदोलनात फूट नाही

पिंपरी-चिंचवडमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी मनोजदादा लढत आहेत. त्यांच्यासोबत इतर संघटना देखील त्यांच्या पद्धतीने लढत आहेत. त्यामुळे याला मराठा संघटनांमध्ये फूट पडली असे म्हणता येणार नाही. कोल्हापूरच्या बैठकी आधी या संघटनांच्या एक दोन बैठकासुद्धा झाल्या होत्या.

Manoj Jarange Patil
Delhi Assembly : दिल्लीत आणखी एक गुप्ता मोठ्या पदावर; मोदी-शहांकडून पुन्हा सरप्राईज...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com