Mahadev Jankar News : 'जरांगे 7 दिवस मतदारसंघात फिरले, पण...' मतदानानंतर जानकर परभणीबद्दल काय म्हणाले ?

Political News : परभणी लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी हे गाव येते. या अंतरवाली सराटीगावातून मला जवळपास 70 टक्के मतदान पडत आहे. तर माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला केवळ 30 टक्के मतदान मिळत आहे.
Mahadev Jankar| Sanjay Jadhav
Mahadev Jankar| Sanjay JadhavSarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार राज्यभरात जोरात सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून सध्या जोरात प्रचार सुरु आहे. प्रचार शिगेला पोचल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकही आरोपाची संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर करण्यात येणाऱ्या टीकेमुळे कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.

परभणी लोकसभा (Parbhni Loksabha) मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी हे गाव येते. या अंतरवाली सराटीगावातून मला जवळपास 70 टक्के मतदान पडत आहे. तर माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला केवळ 30 टक्के मतदान मिळत असल्याचा दावा माजी मंत्री तथा महायुतीचे (Mahayuti) उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला आहे.

Mahadev Jankar| Sanjay Jadhav
Sharad Pawar: शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीचं 'परफेक्ट टायमिंग; ऐन निवडणुकीत भाजपवर टाकला मोठा बॉम्ब

विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील हे सात दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरले पण त्याचा काहीच फरक पडला नाही. परभणी लोकसभा मतदारसंघातून मीच विजयी होणार असल्याचे जानकर यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवड येथील पत्रकारांशी संवांद साधताना ते बोल्ट होते. मी मेलो तरी चालेल पण मी माझ्याच पक्षाच्या चिन्हावर आमदार खासदार होणार आहे. मी कधीच कमळावर किंवा धनुष्यबाणावर दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर आमदार खासदार होणार नाही. दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक राहणं चांगलं, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती शहराने माझ्यावर थोडे प्रेम केलं असतं तर मी पवारांना पराभूत करू शकलो असतो. काही जण मला म्हणत होते कमळ चिन्हावर लढा पण मी ठरवलं आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं. मी पक्ष काढलेला आहे. त्यामुळे मी कोणाचेच ऐकणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?

परभणी लोकसभा मतदारसंघात संबंध निवडणूक प्रचाराच्या कार्यकाळात मराठा विरुद्ध ओबीसी असा प्रचार करण्यात आला. परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसींची संख्या आठ ते नऊ लाख असल्याने माझाच विजय होणार असा दावा देखील जानकर यांनी केला होता. तर दुसरीकडे कडवट शिवसैनिक असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी मात्र सर्वच जाती धर्मांना सोबत घेऊन स्थानिक विरुद्ध बाहेरचा या मुद्द्यावर निवडणूक लढवली. या मुद्द्यावर प्रचार करण्यात आला. त्यामुळे या चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahadev Jankar| Sanjay Jadhav
Mahadev Jankar news : सुनेत्रा पवारांना किती मताधिक्य मिळणार ? जानकरांनी सांगितला आकडा !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com