Manoj Jarange Patil : घबराट, अशक्तपणा अन् लो ब्लडप्रेशर ; मनोज जरांगे यांना सलाईन..

Manoj Jarange Patil's condition worsened : छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना अंतरवालीतही गरजेनूसार उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.
Manoj Jarange
Manoj Jarangesarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक प्रकृती बिघडली. घबराट, अशक्तपणा, अस्वस्थ वाटू लागल्याने अखेर त्यांच्यावर अंतरवाली सराटी येथेच उपचार सुरू करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे ब्लडप्रेशर कमी झाले असून त्यांना डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अंतरवाली सराटीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल सरपंचांच्या शेतातील घरात त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अकरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दौरे, आंदोलन करत आहेत. दरम्यान, त्यांनी पाचवेळा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणही केले होते.

त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून अशक्तपणा, थकवा अधूनमधून जाणवतो. छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना अंतरवालीतही गरजेनूसार उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. आज चार वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले होते.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil : राज्यात आता गोरगरिबांची लाट, सत्ता परिवर्तनासाठी तयार राहा..

घबराट होऊन रक्तदाबही कमी झाल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलावण्यात आले. तपासणीनंतर त्यांना सलाईन लावण्यात आले असून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. (Manoj Jarange Patil) दरम्यान, दुपारीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यात गोरगरिबांची लाट आल्याचे सांगत सत्ता परिवर्तनासाठी तयार राहा, असे आवाहन केले होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानासमोर झालेले आंदोलन यावर आपली भूमिका मांडली. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांनी आपल्या विरोधात अभियान सुरू केल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता.

Manoj Jarange
Uddhav Thackeray On Maratha Reservation : दैवी शक्ती मोदींकडे, तेच मराठा आरक्षणावर तोडगा काढतील; पवारांच्या भूमिकेला ठाकरेंकडून छेद

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मराठा समाजाची महत्वची बैठक लवकरच घेणार असल्याचेही जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर दुपारी चार वाजता जरांगे पाटील यांनी आपल्या अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगितले. घबराटही होत असल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलावण्यात आले. तपासणीनंतर त्यांच्यावर उपचार सुरू असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com