
दिलीप दखने
Maratha Reservation News : मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक-दोन दिवसांत निर्णय घेतील असे अपेक्षित होते. पण त्यांनी मराठा समाजाशी बेईमानी केली, गद्दारी केली, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच आज किंवा उद्या उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. उद्या दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील उपोषण स्थगितीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे त्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण हे त्यांचे सातवे आंदोलन आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही सरकारकडून दखल घेतली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील हे उद्या उपोषण स्थगित करू शकतात. माध्यमांशी बोलतांना त्यांनी एक-दोन दिवसात उपोषण स्थगितीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळातील मनोज जरांगे पाटील यांचे हे पहिले आंदोलन होते. दुपारी माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार की नाही? आज संध्याकाळपर्यंत कळवा, अन्यथा आम्हाला उपोषण मागे घेऊन अन्य मार्गाने लढा द्यावा लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर थोड्या वेळापुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना उपोषण स्थगित करणार असल्याचे सांगितले.
सरकारचा एकही मंत्री, खासदार, पालकमंत्री या आंदोलनाकडे अद्याप फिरकलेला नाही. दरम्यान काल रात्री उशिरा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन ते आले होते, अशी चर्चा असतानाच आता जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गद्दारी केली आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. आंदोलन संपल्यावर यावर सविस्तर बोलणार आहे.
फडणवीस यांचे मौन, लपवाछपवी हे सांगून जात आहे. मतापुरता मराठा समाजाचा वापर केला हे योग्य केले नाही. उपोषणाला बसल्यावर एक दोन दिवसांत निर्णय होईल ही अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. फडणवीस यांनी समाजाशी बेईमानी, गद्दारी केली हे चांगले केले नाही. फडणवीस यांनी मराठ्याचे मन जिंकायला पाहिजे होते. फडणवीस यांनी द्वेष कायम ठेवला, आरक्षणात दगा फटका झाला. आज ,उद्या उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.