Santosh Deshmukh Murder Case : धनंजय देशमुख धाय मोकलून रडले, जरांगेंना अश्रू अनावर; 'मुंडेंना जेलमध्ये टाका'

Manoj Jarange Patil : संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झाले असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
Santosh Deshmukh Murder Case 5
Santosh Deshmukh Murder Case 5Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आल्याचे फोटो आता समोर आले आहेत. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. बीड जिल्ह्यातील राज्यातील वातावरण या प्रकरणामुळे आणखी तापणार असून अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झाले असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे. तर मराठा आंदोलन मनोज जरांगे देखील मस्सा जोगमध्ये दाखल झाले असून त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबियांना धीर दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या गोष्टीला आता 90 दिवस होत आहेत. दरम्यान आता संतोष देशमुखांची हत्या आणि मारहाण करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली होती.

दरम्यान या हत्येमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला असून बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. दरम्यान आज (ता.4) मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्यासमोर ढसाढासा रडले. तसेच माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील. मला आता वेदना सहत नाहीत, मला आई समोर बसल्याने, मुलं येथे असल्याने मला रडताही येत नाही. मला भावाला वाचवता आले नाही, अशी खंत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case 5
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली; संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू...

तसेच सध्या मला कोणत्याच राजकारण्याशी बोलण्याची इच्छा नाही. ज्या राजकारणी या लोकांना वाचवले त्यांना कळायला हवं होतं असेही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना धीर देताना, या लोकांना आता सोडायचं नाही, असा इशारा दिला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याने कोणीही खचलं असतं. पण आता देशमुख आणि कुटुंबियांनी लडायला हवे. तर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा फक्त राजीनामाच न घेता. त्यांना जेल मध्ये टाकलं पाहिजे. संतोष भैया ना न्याय मिळणारच. आपण मागे हटणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Santosh Deshmukh Murder Case 5
Manoj Jarange Patil : ‘इतक्या क्रूर माणसाला भेटायला जायची काय गरज होती?; धस हा विषय माझ्यासाठी संपलाय’

तसेच मनोज जरांगे यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत कराड गँगचा सुपडा साफ करू, असा इशारा देताना, हा गुन्हा करणाऱ्यांना शासन कठोर शिक्षा करणार आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्रात असा गुन्हेगारीचा सुळसुळाट खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी आतापर्यंत कृष्णा आंधळेला का अटक केली नाही? असाही सवाल उपस्थित केला आहे.

तर या आधी देखील धनंजय देशमुख यांनी आरोपींनी केलेलं कृत्य अतिशय चुकीचं असून भावाची त्रास देवून हत्या करण्यात आली. आता त्याचे फोटो समोर आले आहेत. जे बघवत नाहीत. मला बोलण्याची हिंमत नाही. या सर्व प्रकरणाला जातीवादाचे स्वरुप आणलं जात होतं. मात्र आम्ही जातीवाद नाही. या सर्व आरोपींची जात विकृती असल्याची संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com