Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंचे 'ओएसडी' मंगेश चिवटे जरांगे पाटलांच्या रडारवर

Manoj Jarange Patil on CM OSD Mangesh Chivate : मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन त्यानंतरच्या सरकारसोबतच्या वाटाघाटींमध्ये शिंदे सरकारची 'वकीली' करणाऱ्या मंगेश चिवटेंवर जरांगे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Manoj Jarange Patil on CM OSD Mangesh Chivate
Manoj Jarange Patil on CM OSD Mangesh Chivate Sarkarnama

Manoj Jarange Patil on CM OSD Mangesh Chivte : शिवसेनेतील फुटीपासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर एका आयएएस ऑफिसर सारखा रुबाब ठेवणारे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या रडारवर आले आहेत. मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन त्यानंतरच्या सरकारसोबतच्या वाटाघाटीमध्ये शिंदे सरकारची 'वकीली' करणाऱ्या मंगेश चिवटेंवर जरांगे यांनी जोरदार घणाघात केला.

"आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना चांगलं म्हणतो, पुढेही म्हणणार आहे. पण त्यांचा ओएसडी दिल्लीपर्यंत पळायला लागला आहे. आम्हाला सगळं कळतं, कोणाच्या गाड्या आहेत, ते काय करत आहेत. मुख्यमंत्री मराठ्यांचा असूनही त्यांचे ओएसडी मात्र हसून खेळून गोड बोलतात, आणि प्रत्येकवेळी कार्यक्रम मराठ्यांचाच लावतात." अशा शब्दात जरांगे यांनी चिवटेंवर घणाघात केला.

जरांगेच्या आरोपामुळे सरकारच्या वर्तुळात राहून नको त्या बाबींमध्ये नको तेवढं लक्ष घालून कॅमेऱ्यापुढे राहण्याची चिवटे यांची हौस आता फिटण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंड त्यांनंतर शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना, सरकारच्या भूमिका, तसंच सरकारच्या काही महत्वाच्या अंमलबजावणीमध्ये चिवटे हे पडद्यामागून भूमिका निभावत होते. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहत होते. आता मात्र मराठा आंदोलनाच्या बाबतीत केलेल्या वाटाघाटी त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil on CM OSD Mangesh Chivate
Manoj Jarange Patil :...अन्यथा 'करेक्ट' कार्यक्रम करू; जरांगे-पाटलांचा इशारा कुणाला?

कारण वाटाघाटीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने मराठ्यांचा कार्यक्रम केल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. शिवाय चिवटे आणि त्यांचे लोकं दिल्लीपर्यंत जायला लागली आहेत. ते कशासाठी जातात हे आम्हाला माहिती आहे. काही दिवसांनी त्यांचं षडयंत्र उघडं होईल, असं म्हणत जरांगेंनी चिवटेंसह सरकारला इशारा दिला आहे.

कोण आहेत मंगेश चिवटे ?

एकनाथ शिंदे शिवसेनेत होते तेंव्हापासून चिवटे त्यांच्यासाठी काम करायचे, त्यांच्या वर्तुळात रहायचे. शिंदे नगरविकास मंत्री झाल्यानतंर त्यांच्या अनेक महत्वाच्या भुमिकांमध्ये हस्तक्षेपही ते करायचे. शिवसेनेत बंड झालं, या बंडाच्या काळातही चिवटे यांनी सुरत-गुवाहाटी आणि मुंबईतही बंडखोर आमदारांच्या सोयीसाठी अनेक गोष्टी केल्याचं सांगितलं जातं.

Manoj Jarange Patil on CM OSD Mangesh Chivate
Manoj Jarange patil: 'मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा अन्यथा...', सकल मराठा समाजाचा एकनाथ शिंदेंना इशारा

शिवाय शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच त्यांना मुख्यमंत्र्याचे ओएसडी म्हणून नेमण्यात आलं. त्यानंतर मात्र मंगेश यांनी राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून छाप पाडण्याचं काम केलं. मराठा आंदोलन मुंबेईच्या दिशेने जाताना त्यांनी जरांगे यांची भेट घेतली. सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थी केली. मात्र आता हीच मध्यस्थी त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com