Manoj Jarange Patil News : 'गुलामीचं गॅझेट' म्हणणाऱ्यांना मरेपर्यंत हिसका दाखवा, सुट्टी देऊ नका : मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणावर?

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायणगड दसरा मेळाव्यात भाषण करताना मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली.
Maratha quota activist Manoj Jarange Patil indirectly targets BJP leader Pankaja Munde during his speech at Beed’s Narayangad Dasara rally.
Maratha quota activist Manoj Jarange Patil indirectly targets BJP leader Pankaja Munde during his speech at Beed’s Narayangad Dasara rally.Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला तर मरेपर्यंत त्याला झटका देत राहायचं. जातिवंत मराठ्याची अस्सल औलाद त्याला म्हणायचं, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते बीड जिल्ह्यातील नारायणगड येथील दसरा मेळाव्यात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये निजामशाही आणि गुलामगिरी याबाबत वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुमच्या डोक्यात किडे पडलेत. तुमच्या डोक्यातील दया-मया जात नाही. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला तर मरेपर्यंत त्याला झटका देत राहायचं. जातिवंत मराठ्याची अस्सल औलाद त्याला म्हणायचं. त्याला वाटलं पाहिजे हे सोबत फिरतात, पण इतके माझ्या जवळचे लोक फोडून मला पाडले कसे? तुम्हाला कडवट बनावं लागेल.

निवडणुकीआधी ते आपल्याला डिवचतात. त्यावर मी उत्तर देतो. त्यानंतर 4 महिने शांत होतात. पण ते एक शब्द आपल्या काळजाला लागेल असं बोलतात. उदाहरणार्थ गुलामीचं गॅझेट म्हणणारे. गुलामीचं गॅझेट म्हणायचं आणि तीन चार महिने गप्प बसायचं. जे जे बोलले त्यांच्याबद्दल म्हणतोय. आता आमचं गुलामीचं गॅझेट असेल तर इंग्रज तुमच्या घरात राहत होते का? तुमच्या परिवारातील आहे का? मी यावर काही बोललो नव्हतो. मी टीका केली तर कसं वाटेल? असा सवाल जरांगेंनी केला.

लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखू नका. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅझेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅझेट गुलामीचं होतं म्हणजे आमची लेकरं सुद्धा गुलाम समजता का? जे जे त्या पक्षात काम करतात, तिच्यासोबत काम करता त्या मराठ्याच्या पैसाद कोण कोण आहे? तुमच्या पोराला, तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हंटलं आहे. करतो का प्रचार? 10-5 लाखांच्या कामासाठी कुठेपर्यंत चाटणार? तुझा स्वाभिमान जागा ठेवं. तुझ्या जातीला घाण बोललं गेलं, असाही सल्ला जरांगे यांनी दिला.

तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हंटलं आहे. आपली जर गुलामीची पैदास आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनो कशाला तिथं काम करता? तुमचा स्वाभिमान जागा होऊ दे ना, राजकारण गेलं खड्ड्यात. 10-5 रुपयांचा काम काडी लावत गेलं. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? आम्ही गुलामीचं गॅझेट घेतलं म्हणता, इंग्रज काय तुमच्या परिवारातील होती का? मग तुम्ही 1931 ची जनगणना स्विकारली. त्याच आधारे आरक्षणही घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Maratha quota activist Manoj Jarange Patil indirectly targets BJP leader Pankaja Munde during his speech at Beed’s Narayangad Dasara rally.
Manoj Jarange: रुग्णवाहिकेतून नारायणगडावर पोहचले जरांगे पाटील; सभेपूर्वीच झाले अश्रू अनावर

इंग्रजांच्या जनगणनेने आरक्षण दिलं आहे तुम्हाला? मग तुम्ही कोण? असं आम्ही म्हणायचं का? म्हणालेलो नाही आणि म्हणणारही नाही, कारण आम्ही बिघडलेल्या रक्ताचे नाही. त्याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणालो का, की आमचं गुलामीचं गॅझेट आहे. मग तुम्ही तिकडे राजस्थानहून अकबर बादशाहकडून पळून आला आणि इकडे निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणालो नाही. माजलेले नीट करायची ताकद मराठ्यांमध्ये आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com