Maratha Reservation: मराठा आंदोलकांसाठी जाणारी खाण्यापिण्याची मदत रोखली; काँग्रेसचे माजी आमदार पोलिसांना अटल सेतूवरत भिडले

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानात त्यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. तर त्यांच्या या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत जमा झाले आहेत. पण आता या आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होताना दिसत आहेत.
Congress Former MLA Vikram Sawant clashes with Mumbai Police at Atal Setu
Congress Former MLA Vikram Sawant clashes with Mumbai Police at Atal Setusarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.

  2. आंदोलकांना जाणारी खाण्यापिण्याची मदत सरकारकडून अडवली जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.

  3. अटल सेतूवर माजी आमदार विक्रम सावंत आणि मुंबई पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला होता.

Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने माराठा आंदोलक आझाद मैदानासह आजुबाजूच्या परिसरात बसले आहेत.

आता त्यांच्या खाण्यापिण्याची गैरसौय होत असून सरकारकडून आंदोलकांना जाणारी मदतच अडवण्याचा प्रकार सुरू असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याआधी आंदोलकांकडून याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता काँग्रेसचे माजी आमदार आणि पोलिसांच्यात झालेल्या वादामुळे गाड्या आडवल्या जात असल्याचे समोर आले आहे.

मराठा समाजाच्या रखडलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनात हजारो मराठी बांधव देखील सहभागी झाले आहेत.

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्खेने मराठा बांधवांना एकत्र आल्याने आता आझाद मैदावर त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. अशातच मराठा बांधवांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पण मराठा बांधवांना घेऊन जाणारी रसदच पोलिसांकडून रोखण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

Congress Former MLA Vikram Sawant clashes with Mumbai Police at Atal Setu
Maratha Reservation Video : मराठा आरक्षणप्रश्नी सरकारच्या हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी रात्रीच घेतली बैठक, ॲडव्होकेट जनरलही उपस्थित

जत येथेन जेवून घेऊन मुंबई प्रवेश करतानाच असाच प्रकार अटल सेतूवर घडला. त्यावेळी माजी आमदार विक्रम सावंत यांच्यात आणि मुंबई पोलिसांत जोरदार वाद झाला. सावंत यांनी पोलिसांना जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.

जोरदार वादावादीनंतर मात्र पोलिसांनी वाहने सोडून दिली. यानंतर कोणत्याही प्रकारे हुज्जत न घालता मराठा आंदोलक शांतपणे आझाद मैदानावर दाखल झाले. यानंतर सावंत यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला.

राज्यभरातून मदतीचा ओघ

मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. येथे जरांगे यांच्यासह हजारो मराठा बांधण बसले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचे आता हाल होऊ नये म्हणून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून कोल्हापूर, सांगलीसह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मदत पोहचत आहे.

मुंबईत देखील स्थानिक लोक जेवनाची सोय करताना दिसत आहेत. दरम्यान जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देखील सुमारे पाच हजार भाकरी, कळी, बिस्कीट, पाणी बाटल्यांची मदत मराठा बांधवांसाठी पाठवण्यात आली आहे.

Congress Former MLA Vikram Sawant clashes with Mumbai Police at Atal Setu
Amit Thackeray On Maratha Reservation : मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर जिव्हारी लागणार टीका पण अमित ठाकरेंनी मराठ्यांचं मन जिंकलं, थेट आदेश दिला

FAQs :

प्र.१. मनोज जरांगे पाटलांचे उपोषण कुठे सुरू आहे?
उ. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

प्र.२. आंदोलनादरम्यान कोणती नवी घटना घडली?
उ. अटल सेतूवर आंदोलकांना जाणारी मदत अडवली गेल्याचा आरोप होत असून यावरून पोलिसांशी वाद झाला.

प्र.३. विक्रम सावंत यांची भूमिका काय होती?
उ. आंदोलकांना मदत अडवली जात असल्याने त्यांनी पोलिसांना जाब विचारला आणि आक्रमक पवित्रा घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com