Maratha Reservation : मराठा आंदोलकांसमोर महापालिका हतबल, प्रशासनाची दमछाक; हजारो कर्मचारी फिल्डवर पण 'दैना' थांबेना!

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आजपासून त्यांनी पाणीही पिणार नसल्याचे सांगितले आहे. या आंदोलनामुळे आंदोलकांसह मुंबईकरांची गैरसोय वाढली आहे.
On the fourth day of Manoj Jarange’s Maratha reservation protest, he begins water fast; agitation disrupts daily life in Mumbai, causing traffic and civic problems.
On the fourth day of Manoj Jarange’s Maratha reservation protest, he begins water fast; agitation disrupts daily life in Mumbai, causing traffic and civic problems.Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. आजपासून त्यांनी पाणीही पिणार नसल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारसोबतच्या चर्चा यशस्वी होत नसल्याने हे आंदोलन लांबत चालले आहे. आंदोलन लांबल्याने आंदोलकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. पाऊस असल्याने सोबत आणलेले कपडे, गाद्या हे साहित्य भिजले आहे.

ज्याप्रमाणे आंदोलकांची गैरसोय होत आहे, त्याचप्रमाणे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातील सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे कचऱ्याची. आंदोलन स्थळी आझाद मैदान ते सीएसटी परिसरासह मुंबईत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. 3 दिवसांपासून कचऱ्याने भयानक रूप धारण केले आहे.

मुंबई महापालिकेने आंदोलन स्थळ, आझाद मैदान, सीएसटी परिसरात स्वच्छतेसाठी तीन शिफ्टमध्ये सुमारे 1200 कर्मचारी फिल्डवर उतरवले आहेत. ही स्वच्छता करताना महापालिकेची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. अशा या आंदोलनाला महापालिका पहिल्यांदाच सामोरे जात आहे. आम्ही स्वच्छता करताना हतबल ठरत आहोत, अशी एका अधिकाऱ्याने 'सरकारनामा'शी बोलताना प्रतिक्रिया दिली.

गेल्या 3 दिवसांत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने 22 मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आंदोलनादरम्यान, सुमारे 30 मेट्रिक टनापेक्षा अधिक कचरा निघण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. या साफसफाईसाठी 3 दिवसांपासून 3 शिफ्टमध्ये 1200 कर्मचारी फिल्डवर उतरवले आहेत. कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सवातील सुट्ट्या रद्द करून फिल्डवर उतरवण्यात आले आहे.

On the fourth day of Manoj Jarange’s Maratha reservation protest, he begins water fast; agitation disrupts daily life in Mumbai, causing traffic and civic problems.
Amit Thackeray On Maratha Reservation : मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर जिव्हारी लागणार टीका पण अमित ठाकरेंनी मराठ्यांचं मन जिंकलं, थेट आदेश दिला

वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचीही चांगलीच दमछाक होत आहे. लाखो आंदोलकांची हजारो वाहने एकाचवेळी मुंबईत धडकल्याने वाहतूक व्यवस्थेची पहिल्याच फटक्यात विकेट पडली. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि वाहने शहरात धडकू शकतात, याचा अंदाज सरकारला नव्हता. त्यामुळे 29 ऑगस्टलाच वाहतुकीचे 12 वाजले होते.

त्यादिवशी हाताबाहेर गेलेली परिस्थिती अजूनपर्यंत नियंत्रणात आलेली नाही. आझाद मैदान, सीएसएमटी, बीएमसी, चर्चगेट, मंत्रालय या भागात मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरल्याने मोठी वाहतूक कोंडी आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवरही वाहतूक कोंडी कायम आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीची धास्ती घेऊन आतापर्यंत 80 हजार वाहनांनी यु-टर्न घेतला आहे.

On the fourth day of Manoj Jarange’s Maratha reservation protest, he begins water fast; agitation disrupts daily life in Mumbai, causing traffic and civic problems.
BJP Leader On Maratha Reservation Protest: वादग्रस्त वक्तव्यांमुळे आंदोलन चिघळतंय? मराठा समाज अधिक आक्रमक होतोय?

मध्य रेल्वेचे मुख्यालय व जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या सीएसएमटी स्थानकालाही मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसला आहे. कार्यकर्ते दिवसभर आझाद मैदानावर असतात आणि रात्री विश्रांतीसाठी सीएसएमटी स्थानकावर आश्रय घेतात. दररोज हजारो आंदोलक मुक्काम करीत असल्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रचंड ताण येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

या आंदोलकांसाठी विविध सामाजिक संस्था जेवण, नाश्ता व फळांचे वाटप करीत आहेत; मात्र या उपक्रमामुळे स्थानकाच्या आवारात कचऱ्याचे ढीग लागले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या स्थानकाचे संचालन सुरळीत ठेवणे, हे मध्य रेल्वेपुढचे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. गर्दी व अस्वच्छतेमुळे स्थानकाचे नियोजन संपूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com