Manoj Jarange Patil : 'अभ्यासक यावेळी चुकला तर बघाच...' : जरांगेंनी घेतला वाशीचा धसका, एका तासाची दिली मुदत

Maratha Reservation Protest : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.
State government delegation comprising Radhakrishna Vikhe Patil, Shivendraraje Bhosale and other members meets Manoj Jarange Patil
State government delegation comprising Radhakrishna Vikhe Patil, Shivendraraje Bhosale and other members meets Manoj Jarange Patil sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. आझाद मैदानावर मराठा समाज आरक्षणासाठी मोठ्या संख्येने जमला असून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशी पोहोचले आहे.

  2. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मसुदा सादर करून चर्चाही केली.

  3. मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला की यावेळी अभ्यासक चुकला, तर परिणाम भोगावे लागतील.

Mumbai News : मुंबईच्या आझाद मैदानावर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हजारो मराठा बांधव जमले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आमरण उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यादरम्यान राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीस पोहोचले व चर्चाही केली. यावेळी जरांगे यांनी इशारा देत सांगितले, “अभ्यासक यावेळी चुकला तर बघाच…” तसेच आपल्या अभ्यासकांवर रोख करताना त्यांनी टीका केली. “आधी सगळ्यांनी ‘होय’ म्हटले, नंतर माझ्यावर ढकलले. सगळे लय चाबरे आहेत. जाग्यावर म्हणतात योग्य आहे, पण अर्ध्यावर गेल्यावर म्हणतात मुद्देच चुकले.” त्यांनी पुढे सांगितले, “ही प्रत विखे साहेब आणि राजे गेल्यावर दिली जाईल आणि त्यावर चर्चा केली जाईल. तुम्हाला मान्य असेल तर लगेच एका तासात राज्यपालांच्या सहीने शासन निर्णय काढला जाईल.”

उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे सरकारने प्रयत्न सुरू होते. दरम्यान हे आंदोलन मोडून काढण्यासाठी देखील पावले उचलली जात होती. एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर पोलिसांकडून आंदोलकांसह त्यांची वाहने काढण्याकडे भर दिला जात होता.

State government delegation comprising Radhakrishna Vikhe Patil, Shivendraraje Bhosale and other members meets Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Agitation: आता मनसे उतरली मैदानात, म्हणाले, शिवरायांची शपथ घेणारे एकनाथ शिंदे गप्प का?, आहेत कुठे!

यादरम्यान जरांगे यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला. त्यांनी मागणी केलेल्या महत्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात हैदराबाद गॅझिटियलची अंमलबजावणी होणार आहे. तसेच सातारा गॅझिटिरनुसार अंमलबजावणी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तर ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ते देखील मागे घेतले जाती. तर मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सरकार 1 आठवड्यात मदत देणार असल्याचे निर्णय झाले आहेत.

यावेळी झालेल्या चर्चे वेळी जरांगे यांनी भेटीस आलेल्या शिष्टमंडळाची फिरकी घेतली. त्यांनी यावेळी अभ्यासक यावेळी चुकला तर बघाच... असे सुनावले आहे. त्यांनी, "विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती की, हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करावी. त्यावर सरकारने लेखी मागणी मान्य केल्याची माहिती दिली. तसेच यात जर काही बदल सुचवायचा असेल तर तिही संधी दिली जाईल. तसेच एकदा या मागण्या मान्य झाल्या की लगेच त्याचा तातडीने शासन निर्णयही काढला जाईल असेही ते म्हणाले.

तसेच जे निर्णय किंवा मुद्दे यांनी मान्य केले आहेत. ते आपल्या अभ्यासकांना दाखवले जातील. जे मुद्दे समोर आले आहेत. ते योग्य आहेत का याची पडताळणी केली जाईल. नाहीतर पुन्हा एकदा वाशीत जे झालं तसंच व्हायचं. आधी सगळ्यांनी व्हय म्हणाले, नंतर माझ्यावर ढकलेले, सगळे लय चाबरे आहेत. हे अभ्यासक. जाग्यावर हा म्हटले आणि अर्ध्यावर गेल्यावर म्हणाले मुद्देच चुकले. त्यामुळे ही प्रत विखे साहेब आणि राजे गेल्यावर दिली जाईल त्यावर चर्चा केली जाईल. तुम्हाला मान्य असेल तर लगेच एका तासात त्यावर राज्यपालांची सहीने शासन निर्णय काढला जाईल, असेही ते म्हणाले.

वाशीचा धसका...

यापूर्वी मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनावेळी त्यांचा ताफा वाशीत अडवण्यात आला होता. त्यांना मुंबईकडे जाण्यापासून पोलिसांनी रोखले होते. त्यावेळी नवी मुंबईत त्यांचे आंदोलन संपविताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे मागणीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत कार्यवाही झाली नाही. याचाच धसका आताही जरांगे यांनी घेतल्याचे दिसत आहे.

State government delegation comprising Radhakrishna Vikhe Patil, Shivendraraje Bhosale and other members meets Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : पोलिसांची नोटीस : जरांगेंनी दाखवली 'टोपली', म्हणाले मेलो तरी सोडत नाही..

FAQs :

प्र.१: मनोज जरांगे पाटील का उपोषण करत आहेत?
👉 मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते आमरण उपोषण करत आहेत.

प्र.२: उपोषणाचा आज कितवा दिवस आहे?
👉 उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.

प्र.३: सरकारचे शिष्टमंडळ कोण भेटले?
👉 राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

प्र.४: शिष्टमंडळाने काय केले?
👉 त्यांनी सरकारचा तयार केलेला मसुदा जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवून चर्चा केली.

प्र.५: मनोज जरांगे पाटील यांनी काय इशारा दिला?
👉 त्यांनी सांगितले की "अभ्यासक यावेळी चुकला तर बघाच…", असा इशारा शिष्टमंडळाला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com