Chhagan Bhujbal : मराठा आंदोलनाचा फटका मग अमोल कोल्हे निवडून का आले? छगन भुजबळ यांचा सवाल

Maratha Reservation Chhagan Bhujbal Amol Kolhe : मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसला नाही. मराठा आंदोलन फक्त मराठवाड्यात होते, असे छगन भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal Amol Kolhe
Chhagan Bhujbal Amol Kolhesarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंचा फटका बसल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नाही. मराठा आंदोलनाचा परिणाम मराठवाड्यात फक्त दोन तीन जिल्ह्यांमध्येच झाला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. जर, मराठा आरक्षणाचा फटका बसला तर मग अमोल कोल्हे कसे निवडून आले, असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसला नाही. मराठा आंदोलन फक्त मराठवाड्यात होते. विदर्भात मराठा आंदोलनाचा परिणाम नाही. तेथे मोर्चे देखील निघाले नाहीत. मात्र, तेथे दहा पैकी केवळ तीनच जागा महायुतीने जिंकल्या.

Chhagan Bhujbal Amol Kolhe
BJP On Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा गज्या मारणेशी 'ऋणानुबंध' दिसला; वळणाचं पाणी वळणावर जातं...

महायुतीमध्ये अजित पवारांना Ajit Pawar घेतल्याचा फटका बसल्याची चर्चा आहे. त्यावर भुजबळ म्हणाले अजितदादा प्रामाणिक नेते आहेत. विदर्भात भाजपला फटका बसला आहे. तसेच एका भाजप आमदारांच्या मतदारसंघात देखील भाजप पिछाडीवर आहे.

पहिली निवडणूक 'मशाल' चिन्हावर

छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील आपल्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला. विधानसभेची 1985 ची पहिली निवडणूक 'मशाल' चिन्हावर लढलो. त्यावेळी शिवसेनेकडून अनेक दिग्गज उभे होतो. त्या निवडणुकीत आपण विजयी झालो.

Chhagan Bhujbal Amol Kolhe
Video Raj Thackeray : राज ठाकरेंनी भूमिकेवर ठाम राहावे, अन्यथा मनसेची पुन्हा पीछेहाट!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com