Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis, Manoj Jarange PatilSarkarnama

Manoj Jarange Patil : 'शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजसह एकेकाकडून पैसे घ्या', शेतकऱ्यांच्या खिशात हात घालणाऱ्या सरकारला जरांगेंनी सुनावलं

Manoj Jarange Patil slams CM Fadnavis and Maharashtra government : बीडमधील नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फटकारलं आहे.
Published on
Summary
  1. उस उत्पादक आणि कारखानदारांवरील सरकारच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटलांनी जोरदार टीका केली.

  2. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींकडून मदत घ्यावी असा सल्ला दिला.

  3. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी वंचित राहिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

Beed News : राज्यातील महायुती सरकारने घेतलेल्या तुघलकी निर्णयाविरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये कपात करण्याचा निर्णयावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच खडेबोल सुनावले आहेत. जरागे यांनी, फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसह सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडून शेतकऱ्यांसाठी पैसे घ्यावेत असा टोला लगावला आहे.

राज्यातील अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह राज्यभर पावसाने थैमान घातले ज्यात शेतातील पीक वाहून गेलं, सडलं तर कुठे शेतीचे जमिनच खरडून गेली आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे. अशातच भक्कम मदत न करता राज्यातील महायुती सरकारने तुघलकी निर्णय घेत थेट नुकसान ग्रस्त घेताना शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम केलं आहे. यावरून विरोधकांसह शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच निर्णयाविरोधात आता बीडमधील नारायण गडावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे.

त्यांनी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान जनावरे वाहून गेलीत, बाजरी, सोयाबीन वाहून गेले. शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून 100 टक्के भरपाई द्या. घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, सोनं वाहून गेलं. नळ्या वाहून गेल्या, सर्व वाहून गेले तेवढे पैसे द्यावेत.’ ज्यांचे नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आहे. त्यांना 1 लााख 30 हजार रुपये भरपाई द्या, अशी मागणी केलीय.

Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : विखे पाटलांचा फोन, पण जरांगेंचा प्लॅन ठरला; नारायणगडावरून केली मोठी घोषणा...

ही मागणी करताना त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रहार केला. जरांगे म्हणाले की, शेतकऱ्यांचा एक रुपयाही कापायचा नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे कापण्यापेक्षा फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसह नोकरदार, अधिकारी, सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडून पैसे घ्या, असा सल्ला दिला आहे.

राज्यातील आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा कापून शेतकऱ्यांना द्यावा, असे म्हणताना जरांगे यांनी, फडणवीसांची प्रॉपर्टी कमी आहे का? अजित पवारची कमी आहे का? शिंदे साहेबाकडे काय रोग आलाय का? असे सवाल करत त्यांच्याही संपत्तीतून शेतकऱ्यांना वाटा घ्या.

उद्धव ठाकरे-राज ठाकरेंकडे काय कमी आहे? शरद पवारांकडे तर पुरी काडीच लागली का? असाही सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे नाना पटोले, सोनिया गांधी यांच्यासह नारायण राणे यांचाही उल्लेख करत ठाकरेंचे आमदार पळवणाऱ्या कंबोजकडूनही पैसे घ्या. विखे पाटील, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणेही आहेच. यांच्याकडून पैसे घेताना छगन भुजबळ यांचा उल्लेख छग्या असे कत त्यांच्याकडूनही दोन चार पोते भरून द्या पैशाचे, असा टोला जरांगे यांनी लगावला.

Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : नारायण गडावर जरांगे पाटलांचा मराठ्यांना धडाकेबाज संदेश! म्हणाले, 'मराठ्यांनी आता...'

FAQs :

प्र.१: मनोज जरांगे पाटलांनी कोणत्या विषयावर टीका केली?

उ: उस उत्पादक आणि कारखानदारांवरील सरकारच्या निर्णयावर.

प्र.२: शेतकऱ्यांसाठी त्यांनी कोणती मागणी केली?

उ: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी नेते व सेलिब्रिटींकडून मदत घेण्याची मागणी.

प्र.३: जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्यावर काय टोला लगावला?

उ: फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळवून द्यावी असा टोला लगावला.

प्र.४: या निर्णयामुळे कोणत्या वर्गाला नुकसान होणार आहे?

उ: नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला.

प्र.५: या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?

उ: शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com