

विधान परिषदेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा एवढा धसका घेतला आहे. दिल्लीत 40 हजार पोलीस बंदोबस्तात तैनात आहेत, सर्व मेट्रो रेल्वे स्टेशन बंद, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद, इंटरनेट बंद, कोणी आंदोलनात यायचं नाही, सर्व जंतर-मंतर बंद हा काय प्रकार आहे. देशात हुकुमशाही आहे का, अशी टीकेची तोफ दानवेंनी डागली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, देशभरात आंदोलन सुरु आहेत. आता भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरू झाला आहे. भाजपची राजवट आता जाणार हे ठरलं असल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केली आहे.
दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी हे मुंबईतील क्रांती मैदानाकडे जात असतानाच त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसांनी एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अखेर 8 तासांच्या स्थानबद्धतेनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करत आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून मुंबई पोलीस मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. यावेळी आंदोलनात समर्थन देण्यासाठी आलेला बॉलीवूड अभिनेता इम्रान खानलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनामुळे ऑगस्ट क्रांती मैदानावर अनेक रस्ते बंद करण्यात आले.
कॉक्रोच जनता पार्टीनं सध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. अजिंक्य शिंदे यांनी या पत्रकार परिषदेचं नेतृत्व केलं. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास या तीन प्रमुख नेत्यांना हुकुमशाही पद्धतीनं सरकारनं ताब्यात घेतल्याचा आरोप केला. तसंच आम्ही सरकारला घाबरणार नाही, उद्या पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलन करणार आहोत, अशी घोषणाही यावेळी अजिंक्य शिंदे यांनी केली.
सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी देखील दिल्लीत मोर्चा काढला होता. या वकिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं, पण आता त्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीत होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे पोलीस स्टेशनला निघाले आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरदुपारी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेशी अश्लील भाष्य करत छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या महिलेने आणि नागरिकांनी संबंधित इसमाला पकडून त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जंतरमंतरवर CJP कडून आंदोलकांची घोषणा करण्यात आली असून आंदोलनाच्या आधीच CJP च्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दासला यांना अटक करण्यात आली आहे. तर महत्वाच्या नेत्यांसह 5000 हजार हून अधिकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना देखील ताब्यात घेतले होते. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने त्या सर्व वकिलांना सोडण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
जंतरमंतरवर CJP आंदोलकांची दिल्ली पोलिसांकडून धरपकड केली जात असून आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ताब्यात घेतले आहे. काही वेळा पूर्वीच माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेतले होते. त्याआधी दिल्ली पोलिसांनी थेट विमानात घुसून अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दासला यांना अटक केली होती.
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेडमध्ये शहर भाजपकडून आयोजित साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ उडाला असून साड्या कमी आणि महिला जास्त आल्याने साड्या मिळवण्यासाठी महिलांमध्ये झटापट झाली. सेवा संकल्प अभियांना अंतर्गत भाजपचे महानगर अध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांच्या वतीने अंगणवाडी सेविका सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांना साड्या वाटप करण्यात आल्या. मात्र साड्या वाटपादरम्यान एकच गोंधळ उडाला. साड्या घेण्यासाठी महिला तुटून पडल्या, महिलांमध्ये चढाओढ लागली. एकमेकीच्या हातातून साड्या हिसकावून घेताना महिलांमध्ये झटापट झाली. अनेक अंगणवाडी सेविकांना साड्या मिळाल्या नसल्याने महिलांनी आयोजकाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदे करणार आहेत. आशुतोष रांका, सौरव दास आणि अभिजित दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आमच्या तिघांनंतर अजिंक्य शिंदे हा आंदोलनाचे नेतृत्व करेल अशी घोषणा अभिजीत दीपके यांनी केली.
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. विमानात कारवाई करण्याची काय गरज होती असा सवालही त्यांनी विचारलाय.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तुषार गांधींना सध्या अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवले आहे. जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुषांर गांधी यांच्या हम भारत खेळ लोग संघटनेचे कार्यकर्ते दुपारी ३.३० वाजता ॲागस्ट क्रांती मैदानात जमणार होते, त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ग्रामविकासाला चालना देणे आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती व ग्रामपातळीवरील नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथील मोदी ग्राउंडवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान – सन्माननीय लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास सुमारे १० हजार सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
अभिजीत दीपके हे दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी आलेले असताना त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले. याच दरम्यान, हिंगोली येथे दीर्घ आजाराने त्यांच्या आजीचे निधन झाले, त्यामुळे दीपके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अभिजीत यांची आजी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यांचं वयही झालं होतं. आजारपणामुळे आज त्यांचं निधनं झालं.
दिल्लीत पोलिसांनी सीजेपीच्या काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं... मात्र आंदोलकांना गाडीत बसवल्यानंतर त्यांनी अचानक पोलिसांच्या गाडीचा दरवाजा उघडून तिथून पळ काढलाय... या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली असून, राजधानीत सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे...
दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही. अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील घरावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
जंतर-मंतर येथे पोलिसांनी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार जॉन यांना अडवले. हे शहर सर्वांचे असून पोलिसांनी माझ्या घरी चौकशी केल्याचा विरोध त्यांनी केला.
अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी विमानात घुसून दीपकें आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही. आतापर्यंत २०० आंदोलकांना ताब्यात घेतले असून आता युट्युबर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया, पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
नागरिकांची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करू नयेत, याबाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र दिल्लीत अनेक मेट्रो स्थानके आणि रेल्वे गाड्या अनावश्यकपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे आता मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
वनरक्षक राहुल रामदास बहिरम (वय 30 रा. ढवळी विहीर, जेबापूर) यांनी दुष्काळग्रस्तांची मदत मिळण्यासाठी लागणारा दाखला देण्यासाठी पैशांची मागणी केली. प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये याप्रमाणे दीड हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष सचिन साळुंखे आणि पोलीस निरीक्षक पद्मावती कलर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सरकारने नवी दिल्लीमध्ये 163 कलम लागू केले आहे. त्यामुळे मोर्चे, आंदोलनाला बंदी घालण्यात आली आहे. जंतर मंतरवर जे आंदोलक पोहोचत आहे त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे. तर, इतर आंदोलकांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी CJP चे संस्थापक अभिजीत दीपके मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावरून ते दिल्लीकडे रवाना झाला. आज सीजेपीकडून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने जंतर मंतरवर जाण्यास बंदी घातली असून तब्बल 40 हजार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.