Maharashtra Live Update : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव धारकांना पाठवलं सहलीवर

Political Breaking Live Headlines Updates : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला आहे, यासह आज दिवसभरातील सर्व राजकीय घडामोडी जाणून घेऊ.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

माझी एफडीएमधून बदली झालेली नाही - तुकाराम मुंढे

एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे काम पाहणार आहेत. मात्र, तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिवपदाची जबाबदारी सोपल्यानंतर ते आता एफडीए आयुक्तपदी राहणार की त्यांची बदली झाली? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. याच पार्श्वभूमीवर खुद्द तुकाराम मुंढे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत "माझी एफडीएमधून बदली झालेली नाही, मी एफडीएचा आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे." असं स्पष्ट केलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने नेमले प्रभारी

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक व पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील २५ विधानसभा मतदारसंघासाठी खास प्रभारी नियुक्त केले आहेत. यामध्ये पक्षाचे आमदार, माजी खासदार-आमदार यांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठराव धारकांना पाठवलं सहलीवर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठराव धारकांना सहलीवर पाठवण्यात आलं असून इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ठराव धारकांना सहलीवर पाठवण्यात आलं आहे. क्रॉस वोटिंगचा फटका बसू नये यासाठी महायुतीने ठराव धारकांना सहलीवर पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

सोमेश्वरवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचीच सत्ता

बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com