Maharashtra Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती, यवतमाळ दौऱ्यावर

Political Breaking Live Headlines Updates : राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून आज आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

धाराशिवमध्ये दुष्काळाची दाहकता, मेंढपाळांची मेंढ्यांना जगवण्याची धडपड

धाराशिव जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट आहे पाऊस नसल्याने नदी नाले कोरडेठाक पडले आहेत.तर जनावरांना हिरवा चारा देखील उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत अशातच मेंढपाळांना देखील आपल्या मेंढ्याना जगवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. कर्नाटकातील विजापूर मधील मेंढपाळ धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत मात्र चारा व पाण्या अभावी त्यांचे देखील मोठे हाल होत आहे.सोयाबीनची काढणी झालेल्या शेतात पडलेला पालापाचोळा व मिळेल तिथे पाणी पाजुन या मेंढ्या जगवण्याची मेंढपाळ धडपड करत आहेत.

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात, चंद्रकांत पाटलांचा टोला

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात,असं मिश्कील विधान चंद्रकांत पाटलांनी केले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज वैध ठरल्यानंतर आज सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची भेट झाली, त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांना कॅडबरी भेट देऊन अभिनंदन केलं,तसेच गोपीचंद पडळकर तू बोल कमी आणि काम जास्त कर,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उन्माद नको,उत्साह हवा अशा शब्दात मंत्री चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना कानपिचक्या दिल्या आहेत.

हिंगोलीत यात्रेवर कोरड्या दुष्काळाचा परिणाम

शंभर पेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा उत्सवावर यंदाच्या वर्षी कोरड्या दुष्काळाचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे, देशात मैसूर नंतर क्रमांक दोनचा दसरा उत्सव दरवर्षी हिंगोली मध्ये साजरा होतो. यंदाच्या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याने शेत शिवारातील पिके करपून गेली आहे, त्यामुळे आर्थिक चंचन भासत असल्यामुळे या उत्सवात नागरिकांची गर्दी कमी झाली आहे यामुळे पोट भरण्यासाठी उत्सवात दाखल झालेले किरकोळ व्यावसायिक व मनोरंजनाची साधने चालवणारे व्यापारी देखील संकटात सापडले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती आणि यवतमाळच्या दौऱ्यावर

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती आणि यवतमाळच्या दौऱ्यावर असणार आहेत. महायुतीची उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ अमरावती आणि यवतमाळ मध्ये शिंदेंच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.

नाशिक सोलापूरसह १४ जिल्ह्यांना पावसाचा 'येलो अलर्ट'

राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून आज आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक सोलापूरसह १४ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली तर रायगड, पुणे, सातारा, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com